आज संकष्टी चतुर्थी ! तुम्ही उपवासाला साबुदाण्याची खिचडी, राजगिर्याच्या पुर्या, थालिपीठ नक्की करून पाहिले असेल पण पचायला हलका आणि झटपट होणारा राजगिर्याचा उपमा तुम्ही कधी करून पाहिला आहे का ? चला मग आज करून पाहुया हा उपमा -
साहित्य -
- राजगिर्याचा रवा
- मीठ
- जिरं
- बदामाची पूड
- शेंगदाणे
- खोबरे- मिरचीची पेस्ट
कृती -
राजगिरा भाजून त्याची मिक्सरमध्ये जाडसर भरड करून घ्यावी.
कढईत तेल/तूप गरम करून त्यामध्ये जिरं, शेंगदाणे,खोबरं-मिरचीची पेस्ट टाकून गरम पाणी ओतावे.
उकळी आल्यानंतर त्यात राजगिर्याचा रवा मिसळावा व चवीनुसार मीठ घालून परतावे.
थोड्यावेळ झाकून वाफ येऊ द्यावी. म्हणजे तो व्यवस्थित शिजेल.
अशाप्रकारे झटपट होणारा हा हेल्दी राजगिर्याचा उपमा उपवासाप्रमाणेच इतर दिवशीही तुम्ही जरूर करून पहा. संकष्टी म्हणजे मोदक आलेच पण त्याला हेल्दी ट्विस्ट देऊन तुम्ही चव आणि आरोग्यावरही नियंत्रण ठेवू शकाल. मग पहा नैवेद्याच्या मोदकाची हेल्दी रेसिपी
याचसोबत तुम्ही हे देखील काही उपवासाचे पदार्थ नक्की करून पाहू शकता -
- उपवास विशेष रेसिपी : कंदमुळांची टिक्की
- उपवास विशेष रेसिपी : केळाच्या साटोऱ्या
- उपवास विशेष रेसिपी : राजगिऱ्याचा डोसा
छायाचित्र सौजन्य –indiankhana.net ( फोटो प्रातिनिधिक आहे)
Video Source – Zee marathi / You tube channel
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी , मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा.