चेहर्यावरील अनावश्यक केसांना लपवण्यासाठी अनेकजण स्किन ब्लिचिंगचा पर्याय निवडतात. ब्लिचिंगमुळे काही प्रमाणात चेहर्यावरील केस विरळ होतात. परंतू ब्लिचिंग करण्यापूर्वी काही गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे घरी किंवा सलोनमध्ये ब्लिचिंग करण्यापूर्वी खबरदारी घेणे आवश्यक आहे. नक्की जाणून घ्या त्वचा ब्लिचिंग करण्याचे 6 घरगुती उपाय
- कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल ?
1. माईल्ड ब्लिच क्रिमची निवड करा -
सार्याच ब्लिचिंग क्रिमचा वापर करणे सुरक्षित असते असे नाही. त्यामुळे त्यांची निवड करण्यापूर्वी खबरदारी घेणे आवश्यक आहे. अनेकांमध्ये सोडीयम हायपोक्लोराईटचा समावेश होतो. यामुळे केमिकल रिअॅक्शन झाल्याने ब्रेकआऊटचे प्रमाणदेखील वाढते. डॉ. शेफाली त्रासी नेरूरकर यांच्या मते, ‘माईल्ड ब्लिच क्रिमचा वापर महिन्यातून एकदा करणे ठीक आहे. तसेच जर स्ट्रॉंग़ ब्लिच वापरत असाल तर त्याचा वापर दोन महिन्यातून एकदा करा’.
2. सूचना वाचूना मगच निवड करा -
ब्लिचचा वापर करण्यापूर्वी त्यावरील सूचना नीट वाचा. उजळपणाच्या हव्यासापोटी ब्लिचिंगचा अतिवापर करू नका. ब्लिचिंगचे प्रमाण मर्यादेतच निवडा. कारण अतिवापराचादेखील चेहर्यावर दुष्परिणाम होऊ शकतो.
- काय करू नये ?
1. शुष्क किंवा सेन्सिटीव्ह त्वचेवर ब्लिचिंग करू नका
तुमची त्वचा सेन्सिटीव्ह, शुष्क किंवा पिंगमेंटेशनचा त्रास असणारी असल्यास अशा त्वचेवर ब्लिचिंग करणे टाळा.
2. वारंवार ब्लिच करू नका
सतत त्वचा ब्लिच करणे त्रासदायक ठरू शकते. महिन्यातून एकदाच ब्लिचिंग करावे. ब्लिचिंग केल्याने अनावश्यक केस कमी होतात असे तुम्हांला वाटत असेल पण त्यामुळे त्वचेचे नुकसानदेखील होऊ शकते. ब्लिचिंगमुळे केसांचा रंग त्वचेप्रमाणे होतो. त्यामुळे ते स्पष्टपणे दिसत नाहीत.
3.ब्लिचिंग केल्यनंतर उन्हात जाऊ नका
ब्लिचिंग केल्यानंतर लगेचच उन्हात जाणे टाळा. किमान 1-2 तासांनी बाहेर पडा. तसेच बाहेर पडण्यापूर्वी पुरेशी सनस्क्रीन त्वचेला लावा. तसेच ब्लिचिंग नंतर लगेचच कोणत्याही प्रकारची कॉस्मॅटीक वापरणे टाळा.