Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

अनावश्यक केस काढण्याच्या विविध उपचारपद्धतींचेही आहेत दुष्परिणाम !

$
0
0

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Read this in English

हार्मोनल बदल,वय आणि अनुवंशिकतेप्रमाणे चेहर्‍यावर अनावश्यक केसांची वाढ होते. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर कमी जास्त प्रमाणात केस आढळतात. अनावश्यक केस कमी करण्यासाठी काही जण थ्रेडींग, ब्लिचिंग किंवा वॅक्सचा पर्याय निवडतात. लेझर हेअर रिडकशन हा अत्याधुनिक पर्यायदेखील आज उपलब्ध आहे. डरमॅटोलॉजिस्ट डॉ. जयश्री शरद यांच्या सल्ल्यानुसार यापैकी कोणत्या पर्यायाची निवड करावी आणि कधी कोणती काळजी घ्यावी हे जरूर जाणून घ्या.

  • थ्रेडींग

सलोनमध्ये सहज उपलब्ध असणारी ‘थ्रेडींग’ ही पद्धती सुरक्षित आहे. थ्रेडींगद्वारा भुवया, अप्पर लिप्स किंवा चीनवरील  केस तात्पुरते काढले जातात. काही वेळेस कट्स झाल्याने त्वचेचे नुकसान होते. परिणामी रक्त येणे, इन्फेक्शन होणे, पस होणे असा लहान स्वरूपाचा त्रास होऊ शकतो. वारंवार थ्रेडींग केल्याने काही वेळेस त्वचा काळवंडण्याची शक्यता असते.

  • ब्लिचिंग

ब्लिचिंगमुळे केस विरळ होत नसले तरीही त्याचा रंग हलका होत असल्याने त्वचेवर स्पष्टपणे दिसत नाहीत. सहा आठवड्यांमध्ये एकदा ब्लिचिंग करणे सुरक्षित आहे. संवेदनशील, शुष्क किंवा पिंगमेंटटेशनचा त्रास असणार्‍यांनी ब्लिचिंग करू नये. काही जणांना ब्लिचिंगमुळे अ‍ॅलर्जीचादेखील त्रास होऊ शकतो.

  • वॅक्सिंग

वॅक्सिंगमुळे केस तात्पुरते कमी होत असले तरीही ते थ्रेडींगपेक्षा अधिक फायदेशीर आहे. 4-6 आठवड्यांदरम्यान एकदा वॅक्स करणे योग्य आहे. त्यासाठी टाकाऊ सेलोफॅन स्ट्रिप्सचा वापर करा. आठवडाभरापेक्षा जुने वॅक्स वापरू नये. यामुळे इन्फेक्शन किंवा बॉईलचा त्रास होऊ शकतो. वॅक्स योग्यरित्या साठवलेले असावे.मात्र सेन्सिटीव्ह त्वचा असणार्‍यांना वॅक्सचा त्रास होऊ शकतो.

  • शेव्हिंग

चेहर्‍याची त्वचा नाजूक असल्याने ब्लेडचा वापर करणे चूकीचे आहे. शेव्हिंगमुळे इन्ग्रोव्हन हेअर किंवा बॉईल्सचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्याचा वापर टाळा. उलट एपिलेटरचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते.

  • लेझर हेअर रिडक्शन

लेझर हेअर रिमुव्हल हा अत्याधुनिक आणि उत्तम पर्याय आहे. यामुळे 90% केस कमी होण्यास मदत होते. कायस्वरूपी वाढ  रोखण्यासाठी विशिष्ट अंतराने ही उपचारपद्धती वापरली जाते. मात्र जर तुम्हांला पॉलिसायटिक ओव्हरीज, हार्मोनल इन्बॅलंस किंवा स्ट्रिरॉईडचा घेत असल्यास पूर्ण परिणाम दिसून येणार नाही.

  • कमी त्रासदायक  आणि अत्याधुनिक प्रकारची कोणती उपचार पद्धती आहे का  ?

The Soprano® ICE hair removal laser ही वेगवान आणि कोल्ड लेझर ट्रीटमेंट आहे.10 हर्ट्स प्रति सेंकंद या वेगाने ही पद्धती काम करते. पिंगमेंटेड तसेच कोणत्याही स्वरूपाच्या त्वचेसाठी हा पर्याय सहज फायदेशीर आहे. थंडगार असल्याने त्वचेवर कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. वेदनारहीत या पर्यायाला वापरताना अनेस्थेशिया किंवा नमिंग जेल लावण्याची विशेष गरज नसते.


 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>