Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

बार्ली वॉटरने मात करा वॉटर रिटेंशनच्या समस्येवर !

$
0
0

                   Read this in English 

Translated By  -  Dipali Nevarekar

 छायाचित्र सौजन्य –  Shutterstock

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास त्यातून अनेक शारिरीक समस्या वाढण्याची शक्यता असते. मीठाचे अधिक सेवन आणि कमी प्रमाणात पाणी प्यायल्यास ‘वॉटर रिटेंशन’ होण्याची शक्यता अधिक असते. या समस्येवर मात करण्यासाठी मीठाचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. म्हणूनच या ‘८’ मार्गाने आहारात नकळत वाढणारे मीठ कमी करा. पोटॅशियमयुक्त पदार्थांचा आहारात अधिक प्रमाणात समावेश करा.’बार्ली हा एक असा पदार्थ आहे ज्यामुळे वॉटर रिटेंशनचा त्रास कमी करण्यासोबत मधूमेह आणि वजन घटवण्यासही मदत होते.

  • वॉटर रिटेंशन म्हणजे काय ? 

शरीरातील टिश्यूमध्ये द्रव्य घटक साचून राहिल्याने सूज दिसून येते. याला वॉटर रिटेंशन किंवा एडीमा ( Edema) असे म्हणतात. हृद्यविकार, किडनीविकार, ब्रेन ट्युमर, गर्भारपण यासोबत इंफेक्शनमुळे वॉटर रिटेंशनची समस्या वाढते. काही जणांमध्ये कमी प्रमाणात पाणी प्यायल्यास डीहायड्रेशनच्या त्रासामुळे वॉटर रिटेंशनही वाढू शकते. ही समस्या फारशी गंभीर नाही. तसेच आहारात काही बदल करून हा त्रास कमी करता येऊ शकतो.  डिहायड्रेशनचा त्रास कमी करण्यासाठी या 9 गोष्टींकडे अवश्य लक्ष ठेवा.तसेच शरीरावरील या ’7′ सुजलेल्या अवयवांकडे मूळीच दुर्लक्ष करू नका

डायबिटीस केअर दिल्ली येथील आहारतज्ञ तारा मुरली यांच्या या खास सल्ल्याने पहा कशी कराल वॉटर रिटेंशनच्या त्रासावर मात ?

  • कसे ठरते बार्ली वॉटर फायदेशीर  ? 

बार्ली हे सौम्य प्रकारचे डायरॅटीक आहे त्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते. परिणामी शरीरातील विषारी आणि घातक पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. किडनीस्टोनचा त्रास दूर करण्यासाठी नियमित लिंबूपाण्यासोबत बार्लीचे पाणी पिणेदेखील फायदेशीर ठरते. बार्लीमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण मुबलक आढळते. यामुळे पुन्हा पुन्हा स्टोन होण्याची समस्या आटोक्यात राहण्यास मदत होते. बार्लीतील इन्सोल्युबल फायबर घटक पित्ताशयात  खडे होण्यासही प्रतिबंध करण्यास मदत करते. (नक्की वाचा : पित्ताशयातील खड्यांचा त्रास दूर करणारे ’5′ घरगुती उपाय)

  •  कसा कराल हा उपाय ? 

15-20 मिनिटांसाठी 3-4 कप पाण्यात बार्लीचे दाणे उकळा. ते पाणी गाळून काही काळ थंड होऊ द्या. या पाण्याला चविष्ट बनवण्यासाठी त्यामध्ये लिंबाचा किंवा संत्र्याचा रस मिसळा. शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहण्यासाठी नियमित केवळ साधे  पिण्याऐवजी बार्ली वॉटर प्या. यामुळे तुम्ही हायड्रेटेड रहाल.रात्रभर पाण्यात भिजवलेले बार्लीच्या दाण्यांचे पाणी तुम्ही दिवसातून दोनदा पिणेदेखील फायदेशीर ठरू शकते.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>