Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

14 नातेवाईकांच्या निर्दयी खूनाचे गूढ कायम ! पण तुमच्या आसपासची ‘सायकोपॅथ’व्यक्ती कशी ओळखाल ?

$
0
0

Read this in English 

Translated By  -  Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock (image for representational purpose only)

हसनैन वरेकर या तरुणाने परिवारातील 14 सदस्यांना दावत देण्यासाठी घरी बोलावून त्यांची निर्घुणपणे हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी ( 27  फेब्रुवारी) रात्री ठाण्यात उघड झाला आहे. या हत्याकांडामध्ये हसनैनची बहीण बचावली असून अद्यापही मानसिक धक्क्यातून बाहेर आलेली नाही. शिक्षित, शांत आणि संयमी स्वभावाचा हसनैन वरेकर असे काही कृत्य करू शकेल यावर विश्वासच बसत नसल्याचे मत वरेकर कुटुंबीयांच्या शेजाराच्यांनी व्यक्त केले आहे. काही वर्षांपूर्वीदेखील अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे वरेकर कुटुंबायांना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यामुळे हत्येचा प्रयत्न यापूर्वीदेखील करण्यात आला असून तेव्हा दिलेले अपुरे लक्ष आता 14 जणांच्या जीवावर बेतले आहे.

Thane-Murder-31

छायाचित्र सौजन्य- India.Com

थरकाप उडवणारा हा ठाणे हत्याकांड नेमका का घडला यामागील गुढ उघडण्यासाठी पोलिस यंत्रणादेखील मानसोपचारतज्ञांची मदत घेणार आहे. म्हणूनच आपल्याही आजुबाजूला फिरणार्‍या अशा काही लोकांना सजगतेने वेळीच ओळखले तर भविष्यातील काही धोके टाळण्यास मदत होतील. मानसिक रोगींच्या या वागण्या-बोलण्यातून जाणून घ्या काही छुपे संकेत -

हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल्सच्या मानसोपचारतज्ञ आणि सल्लागार डॉ.केसरी चावडा यांच्या मते, ‘हा हत्याकांड पाहता ही प्री-सायकोटीक बिहेव्हियरची लक्षण आहेत. जी सामान्य लोकांमध्ये सहसा आढळत नाहीत. तसेच काही वर्षांपूर्वीदेखील त्याच्या वागण्यात काही नकारात्मक बदल आढळले असल्यास नक्कीच हा मानसिक आजारांचे संकेत देतात.’

‘आजुबाजूच्या किंवा घरातील व्यक्तींच्या वागणूकीकडे पुरेसे लक्ष न दिले जात नाही. त्यातील गंभीरता फारशी समजून घेतली जात नाही. ठाणे हत्याकांड पाहता, तसेच जवळच्या व्यक्तींचे हुसनैनबाबतचे वर्णन पाहता ही ‘सायकोपॅथ’ची केस असू शकते. यामध्ये काही क्षणिक घेतलेल्या निर्णयापेक्षा रचित कट  अधिक असतो. संबंधित व्यक्तीची वागणूक अगदी सामान्य असते. मात्र क्वचित अचानक चिडणे, निराश होणे असे लहान बदल आढळतात’ असे डॉ पारूल टॅंक -निमाई हेल्थकेअर आणि फोर्टीस हॉस्पिटल्सचे मानसोपचार तज्ञ सांगतात.

डॉ.केसरी चावडा यांनी सुचवलेल्या या लक्षणांनी वेळीच ओळखा सायकोपॅथची लक्षणं -:

  • एकटे असल्यास स्वतःशी बोलत राहणं. प्रामुख्याने मृत्यूबाबत, आत्महत्येबाबत किंवा हत्येबाबत बोलणे.
  • स्वतःवर किंवा इतरांवर सतत संशय घेणं.
  • कमी वेळात वागणूकीत अनेक आणि मोठे बदल आढळणं.
  • अपुर्‍या झोपेबाबत किंवा निद्रानाशाबाबत बोलत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. अनेकदा याकडे ताणतणाव किंवा थकव्याचा परिणाम समजला जातो.
  • सतत समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याचा चूकीचा अर्थ लावणे.
  • जादूटोणा, मांत्रिक गोष्टींच्या कल्पना लढवणे.
  • काही गूढ आणि आभासी आवाज ऐकू येणे.

तुमच्या आसपासच्या व्यक्तींमध्ये अशी काही लक्षणं आढळल्यास मांत्रिक बाबा किंवा जादूटोण्याचा मार्ग न निवडता मानसोपचार तज्ञांची मदत घ्या. वैद्यकीय सल्ल्याने मानसिक रोगांवर वेळीच मात करणे शक्य आहे.


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>