छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Read this in English
मुलांचा आहार पोषक आणि संतुलित असण्याकडे पत्येक आईचा अट्टाहास असतो. मुलांच्या खाण्यातून जंकफूड,चॉकलेट, कॅन्डीज कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता पण नकळत मुलांच्या आहारात जाणारी अतिरिक्त साखर लहान मुलांमध्ये लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटीची समस्या वाढवते. लठ्ठपणाची समस्या मधूमेह तसेच अनेक लाईफस्टाईल आजारांचे प्रमुख कारण बनतात. म्हणूनच डाएटीशन निती देसाई यांनी सुचवलेले हे पदार्थ मुलांच्या आहारात कमीतकमी प्रमाणात येतील याकडे लक्ष द्या.
- एअरेटेड ड्रिंक्स : कोला किंवा आर्टिफिशियल हेल्थ ड्रिंक्स यांमुळे यामध्ये साखर अधिक प्रमाणात आणि पोषकद्रव्य कमी प्रमाणात आढळते. तुम्ही डाएट कोला मुलांना देत असलात तरीही त्यामध्ये साखर अधिक प्रमाणात असते. एका कॅन कोलामध्ये सुमारे सहा चमचे साखर असते. म्हणजे 30 ग्राम साखर.
- रेडीमेड फळांचा रस : उन्हाळ्याच्या दिवसात मुलांना स्वॉश,रोझ सिरप पिणे आवडते. पण यामुळे साखरेचे प्रमाण झटकन वाढते. बाजारात उपलब्ध असलेल्या अशा रसांना अधिक काळ टिकवण्यासाठी साखर अतिप्रमाणात वापरली जाते. यंदाच्या उन्हाळ्यात रहा ‘हायड्रेटेड ‘ या 7 पदार्थांच्या संगे !
- फळांचा रस : एअरेटेड ड्रिंक्स तसेच स्वॉक्श याप्रमाणेच फळांचा रस काढून मुलांना देणे हा पर्यायदेखील नकळत साखरेचे प्रमाण वाढवण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे फळांच्या रसाऐवजी अख्खे फळ मुलांना खायला द्यावे. यामधून शरीराला फायबर्सचा पुरवठा होतो.
- बिस्किट्स : बिस्किटांच्या पुड्यावरील आकर्षक पॅकेजिंग, हेल्दी दावे केले असले तरीही बिस्किटांमधून शरीराला पोषकद्रव्य मिळत नाहीत. बिस्किटं ही रिफाईंड पीठं तसेच कार्बोहायड्रेट्स यांनी भरलेली असतात. त्याचे रुपांपर पचनानंतर साखरेतच होते.
- पॅकेज्ड फूड : नूडल्स किंवा इतर रेडी टू इट पदार्थ साखरेचे प्रमाण वाढवण्यात कारणीभूत ठरते. त्यातील रिफाईंड पीठं आणि कार्बोहायड्रेट्स शरीराला घातक ठरतात. इन्संट नूडल्समध्ये सुमारे 440 कॅलरीज असतात. याचे रुपांतर ग्लुकोजमध्ये होते. ’2′ मिनिटांत बनतात हे पाच हेल्दी पदार्थ, मग इन्संट नूडल्स कशाला हवेत ?
- मध : साखरेपेक्षा मध अधिक गुणकारी असते. मात्र तेही साखरेचे एक रूप असल्याने मुलांना मर्यादीत प्रमाणात द्यावे. दोन चमचे मधातून 10 ग्राम साखर मिळते. ( शुद्ध आणि भेसळयुक्त मधातील फरक ओळखा अन वेळीच धोका टाळा !)
- कॅन्ड फ्रुट्स : कापलेली कॅन्ड फूडस ही अधिक दिवस टिकावी म्हणून साखरेत घोळवलेली जातात. त्यामुळे अशाप्रकारे फळं खाण्याऐवजी ऋतूमानानुसार बाजारात उपलब्ध असलेली फळं मुलांना खायला द्यावीत.
- एनर्जी बार : इन्सस्टंट एनर्जी देणार्या बारमध्ये साखरेचे प्रमाणही मुबलक असते. पण सतत मुलांना एनर्जी बार खायला देणे त्रासदायक ठरू शकते.
- ब्रेकफास्ट सिरल्स : आजकाल बाजारात मुलांना आवडणारी अनेक फ्लेवर्सची सिरल्स उपलब्ध आहेत. परंतू त्यामध्ये पोषकद्रव्यांपेक्षा साखरेचे प्रमाण अधिक असते.