Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ‘बीयांचे’मिश्रण झटपट हटवेल बद्धकोष्ठतेचा त्रास !

$
0
0

तुमच्या खाण्यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते. हा सल्ला बद्धकोष्ठतेचा त्रास होणार्‍या लोकांसाठी अगदी अचूक ठरतो. अरबट चरबट खाणे,  जंक फूड अशा पचायला कठीण असणार्‍या पदार्थांमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास अधिक वाढतो. दिवसाला 4 लीटर पाणी व पुरेसा फायबरयुक्त आहार यांचा दिनक्रमात समावेश केला तरीही  बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवत असेल तर या काही ‘बियांचे’ नक्की सेवन करा. ( तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे 10 ‘आरोग्यदायी’ फायदे !)

सूर्यफुलाच्या बीया, अळशी, तीळ, बदाम यांचा आहारात समावेश केल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येशी सामना करणे शक्य असते. या सार्‍या पदार्थांचे एकत्र मिश्रण करून नियमित घेतल्यास शरीरात पुरेशा प्रमाणात फायबरचा समावेश होतो. यामुळे आतड्यांचे कार्य सुधारते तसेच पचनही सुधारते.

कसे बनवाल हे मिश्रण  ?

  • 2-3 टीस्पून सुर्यफुलाच्या बीया
  • अर्धा चमचा अळशी
  • 1/4 चमचा तीळ
  • 3-4 बदाम

हे मिश्रण एकत्र करून त्याची बारीक पावडर करावी. नियमित एक चमचा पावडर दिवसातून  एकदा  घ्यावी.  यामुळे तुमचा बद्धकोष्ठतेचा  त्रास कमी होण्यास मदत होते. तसेच ही पूड तुम्ही सलाड्वरही भूरभूरल्यास तुम्हांला आराम  मिळेल.

संबंधित दुवे -

बद्धकोष्ठतेवर काही घरगुती उपाय

Translated By – Dipali Nevarekar

Source – Try this homemade mixture for instant constipation relief

छायाचित्र सौजन्य : Shutterstock

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी , मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा. 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles