Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

काळामिरी खा, वजन घटवा !

$
0
0

अनेक पदार्थांची चव  वाढवण्यासाठी, चटपटीत पदार्थांना चटकदार बनवण्यासाठी तुम्ही मिरपूड आहारात घेत असाल. पण वजन घटवण्यासाठी ‘मिरपूड’ मदत करते हे तुम्हांला ठाऊक आहे का ?  मिरपूड पदार्थांवर भूरभूरल्यास शरीर त्यातील अधिकाधिक पोषणद्रव्य  शोषून घेतात. पण त्याचबरोबर शरीरातील फॅट सेल्सचे विघटन करण्यासही मदत होते. मिरपूडमुळे  शरीराची पचनशक्ती सुधारते. अपचन, पोट बिघडणे, गॅस होणे अशा पोटाशी संबंधित समस्या कमी  होण्यास मदत होते.  (वजन कमी करा , चटकदार मसाल्यांनी !)

कशी आहे मिरपूड उपयुक्त ? 

  • तुम्ही काळामिरी अख्ख्या किंवा पावडर स्वरूपातदेखील खाऊ शकता. मात्र जर तुम्ही पावडर खाणार असाल तर ती ताजी बनवून मगच वापरावी.
  • खायच्या पानांमध्ये काळामिरीचे दाणे घालून ते पान खाल्ल्यास वजन घटवण्यास नक्कीच मदत करते.
  •  ग्लासभर गरम पाण्यात चमचाभर मिरपूड, लिंबाचा रस व मध मिसळून प्यावे.

कसे आणि कधी प्याल हे मिश्रण ?

तुम्ही हे मिश्रण दिवसातून एकदा रिकाम्या पोटी प्यायल्यास अधिक फायदेशीर ठरते. पहाटेची वेळ ही मिश्रण प्यायची आदर्श वेळ आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत काम करत राहणार्‍यांसाठी सकाळी शक्य तितक्या लवकर उठून पिणेच फायद्याचे आहे.

खबरदारीसाठी : 

हा घरगुती उपाय आहे. त्यामुळे वैद्यकीय औषधांच्याऐवजी त्याचे सेवन करू नये. तुम्ही याचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

या घरगुती उपायांबरोबर दिवसभरातील काही कामांची स्वयंशिस्त लावा आणि दररोज 500 कॅलरिज घटवा.  जिम, डाएटशिवाय  वजन घटवण्याचा हा उपाय पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.

weightloss-success in marathi

Translated By  -  Dipali  Nevarekar

Source -black-pepper-for-weight-loss


छायाचित्र सौजन्य – shutterstock

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी , मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा. 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>