Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

‘जलनेती’- श्वसनविकारांना दूर करणारा घरगुती उपाय

$
0
0

‘योग’ शास्त्राचं मूळ हे भारतात आहे. त्यामुळे निरोगी स्वास्थ्यासाठी योगविद्येच्या मदतीने अनेक आजारांवर मात करता येते हे आपल्याला ठाऊक असेलच. योगप्रकारांप्रमाणेच  ‘जलनेती’ हादेखील असाच एक प्रकार आहे. यामुळे नाकात जमलेली घाण पाण्याच्या सहाय्याने दूर करता येते. यामुळे  नाकाबरोबरच शरीरही स्वच्छ होते. त्यामुळे टाकाऊ घटक शरीराबाहेर पडण्यास मदत होते. परिणामी अनेक आजारांवर मात करता येते.

जलनेतीचे फायदे -:  

  • नाकातील चिकट स्त्राव व कीटाणू बाहेर पडण्यास मदत होते.
  • दमा (अस्थमा), ब्रोनकायटिस, अशा आजारांपासून आराम मिळण्यास मदत मिळते. ( ‘दम्या’चा त्रास दूर करणारे ‘५’ घरगुती उपाय !)
  • जलनेतीमुळे  कानात होणारा संसर्ग तसेच कानांचे आजार कमी होण्यास मदत होते.
  • एकाग्रता वाढवण्यास मदत होते.
  • नियमित ‘जलनेती’चा प्रयोग केल्यास मानसिक व बौद्धिक समतोल सांभाळण्यास मदत होते.
  • ‘धुम्रपाना’च्या व्यसनापासून तुम्हांला आराम हवा असल्यास जरूर ‘जलनेती’ करा.
  • डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी, मोतिबिंदूची समस्या कमी करण्यासाठी ‘जलनेती’ अत्यंत प्रभावी आहे.

कशी कराल जलनेती ?                 

पतंजली योगपीठाचे सह-संस्थापक आचार्य बालकृष्ण यांच्या मते, ‘जलनेती’ हा योगप्रकार  सहज सोपा  योगप्रकार कोणीही  करू शकतो.

  •  1 लीटर पाण्यामध्ये  10 ग्रॅम  सैंधव मीठ मिसळा. हे पाणी कोमट होईपर्यंत गरम करा  आणि  ‘जलनेती’ पात्रात भरा.
  • मान थोडी उजव्या बाजूला वळवा. उजव्या नाकपुडीजवळ जलनेती पात्र घेऊन जा. या नाकपुडीतून तुम्हांला पाणी आत घ्यायचे आहे.
  • उजव्या नाकपुडीने श्वास आत घेताना पाणीदेखील नाकात घ्या. या वेळी तोंड उघडे ठेवा म्हणजे तुम्ही तोंडानेदेखील थोडा श्वास घेऊ शकाल.
  • हळूहळू उजव्या नाकपुडीत पाणी ओतत रहा.
  • हे पाणी डाव्या नाकपुडीतून आपोआपच बाहेर पडेल.
  • आता  हा प्रयोग पुन्हा डाव्या नाकपुडीने करावा.
  • जलनेती केल्यानंतर कपालभातीदेखील अवश्य करावे. यामुळे नाकात अकडून राहिलेले पाणी बाहेर पडण्यास मदत होते.

विशेष खबरदारी -:

  • सर्दी -खोकल्याचा त्रास होत नसेल तर तुम्ही थंड पाणी मीठ  न घालता वापरू शकता.
  • जर सर्दी-खोकल्याचा त्रास होत असेल तर गरम पाण्यात मीठ घालून जलनेती करा.
  • जर तुम्हांला कफाचा त्रास नसेल तर सुरवातीला  कोमट पाणी आणि नंतर साध्या पाण्याचा वापर करा.

किती वेळ कराल ? 

वास्तवात जलनेतीसाठी काही विशिष्ट कालमर्यादा नाही.  हे सर्वस्वी जलनेती करणार्‍या व्यक्तीवर अवलंबून आहे. हे करताना मध्येच आराम (ब्रेक) घेऊ नये. जलनेती दिवसातून चार वेळा करता येते. तसेच यामुळे सर्दी होण्याचे प्रमाणदेखील कमी होते.

कधी कराल ‘जलनेती’? 

सकाळची वेळ ही ‘जलनेती’ करण्याची आदर्श वेळ समजली जाते. श्वसनाच्या आजारांमध्ये तुम्ही हा प्रयोग सकाळ-संध्याकाळ करु शकता. सर्दीमुळे नाक असेल किंवा खुपच चिकट स्त्राव असेल तर ‘जलनेती’मुळे तुम्हांला झटकन आराम मिळेल. कानाचे दुखणे बरे करण्यासही ‘जलनेती’ मदत करते.

जलनेती करताना तुम्हांला अडचण येत असल्यास.दिवसातून 3-4 वेळा हळूहळू जलनेती करा. म्हणजे सरावाने तुम्ही सहज ‘जलनेती’ करू शकाल.

Translated By – Dipali Nevarekar

Source – combat-all-respiratory-problems-with-jal-neti    

छायाचित्र सौजन्य : Shutterstock

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी , मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा. 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>