Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

भारताचे ‘मिसाईल मॅन’अब्दुल कलाम यांचे निधन !

$
0
0

भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम (84) यांचे शिलॉंगमध्ये आज (27 जुलै) निधन झाले. शिलॉन्ग येथील आयआयएमच्या कार्यक्रमात ते बोलत असताना अचानक मंचावर कोसळले. तातडीने त्यांना नजीकच्या बेथनी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.  बेथनी रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या मते, ‘ कलाम यांचा मृत्यू तीव्र हृद्यविकाराच्या झटक्यामूळे झाला. तसेच त्यांना रुग्णालयात आणले त्यावेळी ते मृतावस्थेतच होते.’

अंतराळ आणि विज्ञान संशोधन क्षेत्रात डॉ. कलाम यांनी भरीव कामगिरी केली आहे. ‘इस्त्रो’ आणि ‘डीआरडीओ’ या भारतीय  संस्थेत त्यांनी अमुल्य कामगिरी केली आहे. तसेच तंत्रज्ञानातील क्रांती भारताच्या आरोग्य क्षेत्रात नक्कीच बदल घडवू शकते. असा त्यांचा विश्वास होता. तसेच ही क्रांती खेड्यापर्यंत घेऊन जाणे गरज  असल्याचे मत त्यांनी  व्यक्त  केले होते. तसेच डॉ. कलाम हे ‘अवयवदाना’बाबतही जागृत होते. नागरिकांनी वयाचे बंधन न पाळता अवयवदानाबाबत पुढाकार घ्यावा. असे त्यांचे ठाम मत होते.

छायाचित्र सौजन्य –  Getty Images

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी , मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा. 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>