Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मधूमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी आहारात वापरा ‘लिंबाच्या सालींचा किस’ !

$
0
0

Read This in English

 Translated By  -  Dipali Nevarekar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात मध-लिंबूरस  मिसळून पिणे ही अनेकांची परफेक्ट स्टार्ट आहे. यामुळे वजन घटवण्यास मदत होते तसेच रोगप्रतिकारशक्तीदेखील सुधारते. जेवणाच्या पानावर लिंबाची फोड नसेल तर ते अपूर्णच असते. लिंबाच्या रसासोबतच त्याच्या सालीमध्ये  अ‍ॅन्टीडाएबेटीक गुणधर्म असतात हे तुम्हांला ठाऊक आहे का ? त्यामुळे पुढच्या वेळीपासून लिंबू पिळल्यानंतर फेकण्यापूर्वी जरूर विचार करा. तुमच्या घरात मधूमेही असतील तर अवश्य लिंबाची साल सोलून स्टोअर करून ठेवा. ( तुम्ही मधुमेहाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करताय का ?)

कसे ठरते फायदेशीर  ? 

लिंबामध्ये पॉलीफेनॉल घटक आढळतात. यामुळे इन्सुलिनचे कार्य सुधारण्यास मदत होते व रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तसेच पोटाजवळील भागातील फ़ॅट साचून राहण्याची क्रिया मंदावण्यास मदत होते. लिंबामध्ये आढळणारे काही घटक यकृतामध्ये ग्लुकोजचे ब्रेकडाऊन करतात. तसेच ग्लुकोज मेटॅबॉलिझम कमी होते. नव्या ग्लुकोज मॉलिक्युल्सची निर्मितीही कमी होते.  रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे घरगुती रामबाण उपायदेखील जरूर करून पहा.

कसा कराल हा उपाय ?

  • सलाडवर लिंबाचा रस पिळण्याऐवजी लिंबाच्या सालीचा किस घाला. यामुळे स्वाद आणि चवही वाढेल. ताज्या लिंबाचा किस घातल्यास तुमचे सलाड नक्कीच चवदार होईल.
  • डाळ किंवा आमटी /रस्साभाजीमध्ये चव वाढवण्यासाठी लिंबाचा किस नक्कीच मदत करेल. 1-2 टीस्पून लिंबाच्या सालींचा किस तुम्ही आमटी किंवा रश्श्यांत मिसळू शकता.
  • मांसाहारी चिकन किंवा मासे मॅरिनेट करण्यासाठी लिंबाच्या रसाऐवजी सालींचा किस मिसळू शकतात. यामुळे मधूमेहींना फायदा होऊ शकतो.

मधूमेहींच्या खाण्या-पिण्यावर अनेक बंधन असतात. पण तुमच्या औषध-गोळ्यांसोबत हा तुमच्या आहारात बदल नक्की करून पहा.

References

  1. Fukuchi Y, Hiramitsu M, Okada M, et al. Lemon Polyphenols Suppress Diet-induced Obesity by Up-Regulation of mRNA Levels of the Enzymes Involved in β-Oxidation in Mouse White Adipose Tissue. Journal of Clinical Biochemistry and Nutrition2008;43(3):201-209. doi:10.3164/jcbn.2008066.
  2.  Jung UJ, Lee MK, Jeong KS, Choi MS. The hypoglycemic effects of hesperidin and naringin are partly mediated by hepatic glucose-regulating enzymes in C57BL/KsJ-db/db mice. J Nutr. 2004 Oct;134(10):2499-503. PubMed PMID: 15465737.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>