Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

थ्रेडींगने आयब्रो केल्यानंतर होणारा त्रास दूर करतील या खास टीप्स !

$
0
0

           Read This in English

Translated By  -  Dipali Nevarekar

आयब्रो करण्यासाठी थ्रेडींगचा पर्याय अनेकजणी निवडतात. मात्र यामुळे कपाळाजवळील भाग सुजणे, लाल होणे अशा प्रकारचा त्रास होतो ? मग या टीप्स नक्कीच तुम्हांला फायदेशीर ठरतील. मग तुम्ही पुढल्यावेळी थ्रेडींग करण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी या टीप्स नक्की लक्षात ठेवा.

  • थ्रेडींग करण्यापूर्वी -: 

थ्रेडींगने आयब्रो करण्यापूर्वी त्यांना थंड पाण्याने ओले करा. यामुळे त्याभागातील संवेदना कमी झाल्याने नम होतील. पाण्याऐवजी तुम्ही बर्फाचे क्युबदेखील फिरवू शकता.

  • थ्रेडींग नंतर -: 
  1. थ्रेडींगमुळे होवारी जळजळ, लालसरपणा, जळजळ, खाज कमी करण्यासाठी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. तसेच सतत चेहर्‍याला हात लावणे टाळा. कारण थ्रेडींगमुळे त्वचा अतिशय संवेदनशील होते.
  2. थ्रेडींग केल्यानंतर त्वचेवरील हेअर फोलिक्समध्ये बॅक्टेरियांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. यामुळे ब्रेकआऊटचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच कापसाच्या बोळ्यावर थोडेसे टोनरचे थेंब घालून चेहरा स्वच्छ करून घ्यावा. सॅलिसायक्लिक अ‍ॅसिडयुक्त टोनर प्रामुख्याने वापरा. यामुळे त्वचेला  तेल मिळेल तसेच बॅक्टेरियांचा नाश होण्यासही मदत होईल.
  3. त्वचेवरील जळजळ कमी करण्याचा उत्तम पर्याय म्हणजे एखादे सौम्य मॉईश्चरायझरचा वापर. मात्र हे मॉईश्चरायझर अ‍ल्कोहल विरहित असावे.
  4. थ्रेडींग केल्यानंतर त्वचेवर खूपच पुरळ येत असल्यास टी-ट्री ऑईलचा वापर करा. कोबरेल तेल किंवा कोणत्याही बेसिक तेलामध्ये टी-ट्री ऑईलचे काही थेंब मिसळा. कापसाने हे मिश्रण कपाळावर लावा. टी-ट्री ऑईलमध्ये अ‍ॅन्टीसेप्टिक आणि अ‍ॅन्टीइंफ्लामेंटरी गुणधर्म आढळतात. लवेंडर तेलही याचप्रकारे वापरल्यास त्वचेवरील त्रास कमी करण्यास मदत करतात. तुमच्याजवळ तेल नसल्यास एखादे अ‍ॅन्टिसेप्टीक ऑईनमेंट वापरू शकता.
  5. थ्रेडींग़ केल्यानंतर लगेचच थेट सूर्यप्रकाशात जाऊ नका. यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. अगदीच घाईत थ्रेडींग़ करून तुम्हांला बाहेर पडणे, फिरणे आवश्यक असेल तर चांगल्या प्रतीचे सनस्क्रीन लोशन वापरा. उन्हाच्या तडाख्यापासून बचावण्यासाठी हॅट किंवा छत्रीचा वापर करावा.

मग आता थ्रेडींगचा अनुभव थोडा सुकर करण्यासाठी या टीप्स पुढच्यावेळी नक्की वापरा.

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>