Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

सिक्स पॅक अ‍ॅब्स बनवायला मदत करतील या एक्सपर्ट डाएट टीप्स !

$
0
0

Read This in English

Translated By  -  Dipali Nevarekar

मॉडेल्स आणि चित्रपटातील अ‍ॅक्शन हिरोंना पाहून अनेकांना त्यांच्याप्रमाणे बॉडी बनवण्याची इच्छा होते. पण सिक्स पॅक अ‍ॅब्स बनवण्यासाठी केवळ जीममध्ये घाम गाळणे पुरेसे नाही. यासोबतीने हेल्दी डाएट घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच फिटनेस फर्स्ट चेन ऑफ रेस्ट्रॉरंटच्या न्युट्रिशनिस्ट एकता टंडन यांनी सिक्स पॅक अ‍ॅब्स कमावण्यासाठी खास डाएट टीप्स शेअर केल्या आहेत.

प्रत्येकाला अ‍ॅब्स हे असतात. मात्र पोटावरील फॅटमुळे ते लपले जातात. म्हणूनच पोटावरील अ‍ॅब्स हे अधिक स्पष्ट करण्यासाठी योग्य व्यायाम आणि आहार घेणे आवश्यक आहे. ( पहा अभिनेता भूषण प्रधान याचा फीटनेस फंडा)

 # 1 विशिष्ट अंतराने आणि थोडे – थोडे खा  -:

दिवसभरात तीनदा भरपूर जेवण्यापेक्षा सतत पण थोडे थोडे खात रहा. यामुळे वेळी-अवेळी जंकफूड खाण्याची इच्छा होणार नाही. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाणदेखील नियंत्रणात राहील. सतत आणि थोडे खाल्ल्याने त्या पदार्थांमधून मिळणारे फॅट्स शरीरात साचून न राहता त्याचे उर्जेमध्ये रुपांतर होते. पोटाजवळील अतिरिक्त चरबी साचून राहणे बंद झाल्यास अ‍ॅब्स अधिक उठावदारपणे दिसून येतात.

कसा कराल हा उपाय ?

  नियमित संतुलित आहार घ्या आणि 3 हलके नाश्त्याचे प्रकार निवडा. 

उदा :

  • सकाळी लवकर : 1-2 ग्लास पाणी
  • 8-9 am:  ब्रेकफास्ट
  • 11-12 pm:  हलका स्नॅक
  • 1-2 pm:दुपारचे जेवण
  • 4-5 pm: हलका स्नॅक
  • 7-8 pm: रात्रीचे जेवण
  • 9-10 pm ( भूक लागल्यास ): ग्लासभर दूध

जिममध्ये व्यायामापूर्वी नाश्त्याला खा हे 5 पदार्थ

#2 प्रोटीन्स :

वर्कआऊट करणार्‍यांसाठी प्रोटीन्स फार आवश्यक आहे. व्यक्तीसापेक्ष त्याचे प्रमाण बदलते. तुमच्या वजनानुसार 1 ग्रॅम/ किलो इतके प्रोटीन नियमित घेणे गरजेचे आहे. तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीनुसार याचे प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकते.

मसल्स बनवण्यासाठी जिममध्ये योग्य तज्ञांच्या सल्ल्याने व्यायाम करणे आवश्यक आहे. प्रोटीन हे मसल्स तयार होण्यासाठी रॉ -मटेरिअल पुरवते. पण मसल्स तयार होण्यासाठी योग्य व्यायामाचीच गरज अस्ते. केवळ प्रोटीन सप्लिमेंट्सवर अवलंबून राहू नका. ( नक्की पहा : स्नॅक टाईमसाठी 8 हेल्दी प्रोटीनयुक्त पदार्थ )

मांसाहार्‍यांनी आहारात चिकन, मासे, अंडी यांचा समावेश करावा. तर शाकाहार्‍यांनी पनीर, चीझ, सोया, दूध, दही यांचा समावेश करावा. आवश्यक असल्यास तुम्ही प्रोटीन शेकदेखील  घेऊ शकता. दिवसात सहा वेळेस प्रोटीन खाणे शक्य नसते. त्यामुळे काही पेयांमधून त्याचा आहारात समावेश करावा.

#3 हायड्रेशन- :

शरीरातील पाण्याचे प्रमाण राखणे आवश्यक आहे. शरीराचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचे आहे. वर्कआऊट करण्यापूर्वी, करताना तसेच केल्यानंतरही पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. व्यायामामुळे डीहायाड्रेशनचा त्रास होणे हे आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते.

 #4 कार्बोहायड्रेट्स -:

वर्कआऊट दरम्यान तुम्हांला उर्जा पुरवण्याचे काम कार्बोहायड्रेट्स करतात. कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला तरीही उर्जेची झीज भरऊन काढण्यासाठी कार्बोहायड्रेट्सची गरज असते. तसेच यामुळे मसल्स कॉन्ट्राक्शनचा त्रास कमी होतो. कार्बोहायड्रेट्सचे साखरेतील विविध स्वरूपात रुपांतर होते. शरीराला त्यातून उर्जा मिळते.

#5 फळं आणि भाज्या -:

फळांमधून  आणि भाज्यांमधून आवश्यक पोषणद्रव्य आणि फायबर्स मिळतात. यामधील पोषणद्रव्यं सिक्स अ‍ॅब्स  तयार करायला आणि फीटनेस राखायला मदत करतात.

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>