लग्न म्हणजे दोन जीवांसोबतच दोन कुटुंबाच्या मिलनाचा सोहळा असतो. परंतू पुरोगामी महाराष्ट्रात आजही हुंड्यासारख्या प्रथा कुटुंब उद्वस्त करणार्या ठरत आहेत. लातूरमध्ये हुंडा देऊ न शकणार्या अठरा वर्षीय मोहिनी भिसे हिने केलेली आत्महत्या आणि बहिणीच्या लग्नासाठी, हुंड्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने सोयरिक मोडल्याने हताश सतीश कदमने विहीर उडी मारून आपले जीवन संपविल्याचे वृत्त मन विषिन्न करून जाते. मात्र खचून जाऊन आत्महत्येचा पर्याय निवडू नका अशी साद अभिनेते नाना पाटेकर यांनी महाराष्ट्रातील कुटुंबियांना घातली आहे.
एकीकडे दुष्काळामुळे अनेक शेतकरी कुटुंब वार्यावर आली आहेत. तर दुसरीकडे यातूनच घरातल्या मुलींचे लग्न आणि धार्मिकविधीचा खर्च आणि हुंडा देऊ न शकणारे स्वतःचे आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळाचे भयाण वास्तव पाहिल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी पुढाकार घेऊन ‘नाम’ संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे शेतकर्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य केले जाते.
प्रत्येकाच्या आयुष्यात चढाव-उतार असतात परंतू डीप्रेशनच्या जाळ्यात अडकून आत्महत्येचा निर्णय घेण्यापूर्वी एकदा हा फोन नंबर फिरवून आपले मन मोकळे करून पहा. तसेच तुमच्या आजूबाजुच्या लोकांच्या मनातील आत्महत्येच्या निर्णयाबाबत लक्ष ठेवण्यासाठी ही काही लक्षण तुम्हांला नक्कीच मदत करातील. ( जाणून घ्या – : लक्षणं नैराश्याची )
अतिथकवा : अनेक दिवसांपासून निस्तेज आणि निरुत्साही राहणे हे एक प्रमुख लक्षण आहे.
भूक मंदावणे : विनाकारण भूक मंदावणे किंवा जेवण निरस वाटणे हे धोकादायक आहे.
दूर राहणे : अचानक एखादी व्यक्ती एकलकोंडी होणे किंवा त्यांच्या प्रियजनांपासून दूर दूर राहणे. त्यांना प्रतिसाद न देणे
निराश राहणे: अचानक ती व्यक्ती आपल्या अपयशाबद्द्ल किंवा स्वतः निरूपयोगी असल्याचे म्हणत असल्यास त्याच्यांकडे दुर्लक्ष करू नका.
कोणत्याच कामात सहभाग न घेणे : अचानक आवडत्या कामातून आणि छंदातून मन काढूण घेणे.
झोप न लागणे : आवश्यकतेपेक्षा कमी झोप घेणे . रात्री झोप न आल्याने अस्वथ्य राहणे.
जीवन संपवण्याबद्दल बोलणे : काही वेळेस मस्करीत किंवा काही वेळेस गांभीर्याने पण आत्महत्येचा विचार मनात येणं हा या आत्महत्येच्या कृतीची पहिली पायरी आहे. त्यामुळे याकडे मुळीच दुर्लक्षित करू नका.
प्रत्येकाचे आत्महत्येचा पर्याय निवडण्याचे कारण वेगवेगळे असू शकते. परंतू बोलून, मानसोपचार्याचा सल्ला घेऊन त्यावर उपाय करा.
छायाचित्र सौजन्य – facebook account / सदर छायाचित्र प्रातिधिनिक स्वरुपातील आहे.