काही दहशतवादी मुंबईत आले असून येत्या काही दिवसात मुंबई रेल्वेवर हल्ला करण्याची शक्यता आहे. अशा स्वरूपातील काही मेसेज सोशल मिडीया आणि व्हॉट्सअॅपवर फिरत आहेत. यामुळे अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण पुरेशी खात्री न करता हे मॅसेज फॉरफड होत असल्याने अनेक अफवांना पेव फुटले आहे. परंतू मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटने असे फ़ॉरवेड केले जाणारे मेसेज या अफवा असून रेल्वेप्रवास सुरक्षित असल्याचा सांगण्यात आले आहे.
Rumour Alert- Please do not believe in rumours about a threat to the local trains.
— Mumbai Police (@MumbaiPolice) January 21, 2016
कोणतेही मेसेज पडताळणी न करता फॉरवड करून विनाकारण भीतीचे वातावरण तयार होऊ देऊ नका. यापुढे असे काही मेसेज तुम्हांला आल्यास कोणत्याही ग्रुपवर फॉरवर्ड करण्यापूर्वी या काही गोष्टी लक्षात ठेवा.
- तुम्हांला मिळालेल्या माहितीवर / मेसेजवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. मुंबई पोलिस किंवा संबंधित विभागाची अधिकृत संकेतस्थळांवर जाणून माहिती तपासून पहा. संबंधित मेसेजविषयी काही माहिती उपलब्ध आहे का ? ते पहा.
- संबंधित विभागाची फेसबुक, ट्विटर इत्यादी सोशल मिडीया हॅन्डल पहा. तसेच अधिकृत पेज किंवा प्रोफाईलवरील माहिती ग्राह्य माना. व्हेरिफाईड प्रोफाईलमध्ये त्यांच्या नावापुढे निळी खूण असते. तुम्हांला आलेल्या मेसेजबाबत माहिती उपलब्ध नसल्यास मेसेज किंवा टाइमलाईनवर तुमच्या मनातील प्रश्न विचारा.
- जर तुम्हांला असे मेसेज मिळत असतील तर त्या व्यक्तीला संबंधित मेसेज कोठून मिळाला याबाबत विचारणा करा. त्यानुसार त्याची खातरजमा करा.
- अफवा पसरवणे टाळा तसेच हे करणार्या लोकांनाही त्यापासून परावृत्त करा. तुम्हांला मिळालेली खात्रेशीर माहितीचा स्क्रिनशॉटचा अफवा पाठवणार्यांना रिप्लाय म्हणून पाठवा.
सोशल मिडीया हे एक प्रभावी माध्यम असून त्याचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करा. अफवा किंवा खातरजमा न केलेली माहिती पसरून लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरवू नका. तसेच अतिरेकी हल्ल्यांबाबत अफवा पसरवण्यापेक्षा रेल्वेप्रवास करताना दक्षता पाळा. आणि हा मेसेज अनेकांना पोहचवण्यासाठी ही पोस्ट नक्की शेअर करा.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock