Read This in English
Translated By - Dipali Nevarekar
चेहर्यावरील पिंपल किंवा व्हाईटहेड्स सौंदर्या सोबतच आत्मविश्वासही कमी करतो. पण काही विशिष्ट दिवसांनी तुमच्या कपाळावर, नाकावर आणि गालांवर हे व्हाईट हेड्स का येतात हे तुम्हांला ठाऊक आहे का? नाही .. मग प्रसिद्ध डरमॅटोलॉजिस्ट सेजल शहा यांच्याकडून व्हाईटहेड्ससंबंधी तुमच्या मनातील काही प्रश्नांची ही उत्तरं जरूर जाणून घ्या.
- का येतात व्हाईटहेड्स ?
पिंपल्स आणि ब्रेकआऊट्सप्रमाणेच त्वचेवर अतिरिक्त तेलाची निर्मिती झाल्यास, काही कॉस्मॅटीक प्रोडक्ट्समुळे, घाण, धूळ, बॅक्टेरिया तसेच डेड स्कीनमुळे व्हाईटहेड्सचा त्रास होतो. त्वचेवरील हेअर फॉलिक्समध्ये तेल आणि बॅक्टेरिया साचून राहणे हे व्हाईटहेडच्या निर्मीतीचे कारण आहे. यामुळे त्याजागी फुगवटा निर्माण होऊन व्हाईटहेडची निर्मिती होते. त्यावर मात करण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून पहा.
- व्हाईटहेड्स फोडणे योग्य आहे का ?
व्हाईट हेड्स दिसताच तो फोडून दूर करणे हा झटपट आणि सोपा उपाय वाटू शकतो. मात्र प्रत्यक्षात यामुळे त्रास अधिकच वाढू शकतो. व्हाईटहेड फोडल्यानंतर त्यातील बॅक्टेरिया, घान आणि तेल त्वचेवर इतरत्र पसरते. यामुळे संसर्ग वाढतो. तसेच यामुळे बॅक्टेरिया आणि तेल अधिक खोल जाऊन व्हाईटहेडचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. वारंवार पिंपल्स फोडल्याने त्वचेवर स्कार्स आणि हायपरपिगमेंटशनचा त्रास वाढतो. ( नक्की वाचा : पिंपल्स गेले पण स्कार्स कसे हटवाल ? )
- कसे रोखाल व्हाईटहेड्स ?
चेहरा नियमित स्वच्छ ठेवणे हा व्हाईटहेड्स दूर ठेवण्याचा सोपा पर्याय आहे. हेअर फॉलिकल्सची छिद्रं मोकळी आणि स्वच्छ राहण्यासाठी सौम्य एक्सफ्लोइटींग क्लिंजरने दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ करावा. यामुळे डेड स्किनचा थर साचून राहत नाहीत. परिणामी छिद्र मोकळी आणि स्वच्छ राहतात. सॅलिसायक्लिक अॅसिड तसेच ग्लायकोलिक अॅसिड असणारी क्लिंजर वापरा. ग्लायकोलिक अॅसिडमुळे व्हाईटहेड्सचा त्रास दूर करण्यास मदत होते. तर सॅलिसायक्लिक अॅसिडमुळे लालसरपणा कमी होतो आणि इंफेक्शन पसरण्याचा धोका कमी होतो. बेकिंग सोड्यामुळेदेखील व्हाईटहेड्सचा त्रास कमी करण्यास मदत होते.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock