Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मुंबई मॅरोथॉन 2016 : धावताना दुखापती टाळण्यासाठी पाळा या खास टीप्स !

$
0
0

Read This in English

Translated By  -  Dipali Nevarekar

मॅरोथॉनमध्ये धावणे किंवा नियमित फीटनेसचा एक  भाग म्हणून धावणे आरोग्यसाठी निश्चितच फायदेशीर आहे. पण धावण्यामुळे मसल्सवर ताण येऊ शकतो. परिणामी दुखणे ओढावण्याची शक्यता असते. म्हणूनच त्यापासून बचावण्यासाठी या खास टीप्स लक्षात ठेवा. सलग 12 वेळेस ‘आयर्नमॅन’ जिंकणार्‍या ‘कौस्तुभ राडकर’ची खास हेल्थ सिक्रेट्स ! पहा आणि येत्या 17 जानेवारीला होणार्‍या मुंबई मॅरोथॉनसाठी सज्ज व्हा !

  • योग्य साईझचे शूज वापरा – : 

धावण्यासाठी योग्य साईजचे आणि आरामदायी शूजची निवड करा. अन्यथा पाय दुखणे, धावताना त्रास होऊ शकतो. धावताना पायाला पुरेसा सपोर्ट मिळेल असेच शूज निवडा. काही शूजमध्ये आतूनच पुरेशी जागा असते. यामुळे घोटा मुरगळ्याची शक्यता कमी होते. ( नक्की वाचा : आता घरगुती उपायांनी करा ‘शू बाइट्स’ ना बाय बाय )

  • स्ट्रेचिंग आणि वॉर्मअप करा -: 

धावायला सुरवात करण्यापूर्वी स्ट्रेचिंग अवश्य करा. स्ट्रेचिंग केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. तसेच लवचिकता वाढते. यामुळे दुखापत होण्याचा धोका कमी होतो. गुडघ्याचे दुखणे कमी करण्यासाठी तसेच अचानक धावताना पायात गोळा येण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी स्ट्रेचिंग नक्कीच मदत करेल.  ( नक्की वाचा : अवघ्या काही सेंकदांत क्रॅम्सपासून सुटका मिळवण्याचा झटपट उपाय !  )

  • क्रॉस ट्रेनिंग करा -: 

धावपटूने केवळ धावण्यावरच लक्ष ठेवावे हे अपुरे आहे. धावण्यासोबत इतर एखादा व्यायामप्रकारदेखील अवश्य करावा. यामुळे शरीराचा समतोल राखण्यास मदत होते. तुमच्या नेहमीच्या व्यायामात स्ट्रेंथ ट्रेनिंगचा एखादा व्यायामप्रकार अवश्य असावा. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे तुमच्या पाठीचे,कंबरेचे स्नायू  मजबूत होतात.  यामुळे धावताना यांना दुखापत होण्याची शक्यता कमी होते.

  • स्वतःवर अधिक ताण घेऊ नका -: 

धावायला सुरवात करण्याच्या दिवसांतच खूप लांब अंतर निवडू नका. हळूहळू ट्प्पा वाढवा. अचानक शरीरावर अधिक ताण दिल्यास  दुखापत होण्याची शक्यता असते. धावताना मध्येमध्ये थोडा ब्रेक घ्या. तसेच आठवड्यात 1-2 दिवस धावण्यातून आराम घ्या.

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>