Read This in English
Translated By - Dipali Nevarekar
तोंड येणे म्हणजेच माऊथ अल्सरचा त्रास हा फारच त्रासदायक असतो. तिखट खाणं, स्ट्रॉबेरी,संत्री अशा सायट्रस फळांच्या अतिसेवनामुळे तर तोंडाचे आरोग्य पुरेसे न जपल्याने माऊथ अल्सरचा त्रास होऊ शकतो. अनेकदा ताण-तणाव, बद्धकोष्ठता यामुळेदेखील माऊथ अल्सरचा त्रास होऊ शकतो.
काही दिवसांनी माऊथ अल्सर आपोआपच ठीक होतो. पण त्यावर वेळीच उपाय केल्यास वेदना आणि त्रास कमी करण्यास मदत होईल. मग माऊथ अल्सरवर मात करण्यासाठी हे काही घरगुती उपाय जरूर करून पहा. अशापैकी एक घरगुती आणि नैसर्गिक उपाय म्हणजे कोरफड !
कशी ठरते कोरफड फायदेशीर ?
शरीरात उष्णता वाढल्याने माऊथ अल्सर होतो. कोरफड दाहशामक असल्याने त्यातील कुलिंग इफेक्ट माऊथ अल्सरचा त्रास कमी करण्यास मदत करते. कोरफडीमध्ये जखम भरून काढण्याची क्षमता आहे. माऊथ अल्सरामुळे त्याच्या आजूबाजूचा भागात वेदना जाणवतात. कोरफडीचा गर जखम भरून काढण्यासोबतच त्यातील जळजळ कमी करण्यास मदत करते. त्यामुळे चिडचिड कमी होण्यासही मदत होते.
कसा कराल हा उपाय ?
कोरफडीच्या पातीमध्ये पांढरा आणि पारदर्शक जेल स्वरूपातील गर आढळतो. चमच्यासहाय्याने त्याचे स्कुप काढा. हा गर अल्सरच्या जागी ठेवा. हा प्रयोग दिवसातून दोनदा केल्यास माऊथ अल्सरचा त्रास कमी होण्यास मदत होईल.
Reference:
1. Babaee N, Zabihi E, Mohseni S, Moghadamnia AA. Evaluation of the therapeutic effects of aloe vera gel on minor recurrent aphthous stomatitis.Dental Research Journal. 2012;9(4):381-385.
Image source: Shutterstock