Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

काजळ पसरू नये म्हणून वापरा या ’5′टीप्स !

$
0
0

Read This in English

Translated By  -  Dipali Nevarekar

सणासमारंभाला जाताना किंवा अगदी कामाला जाताना अनेकजणी किमान आयलायनर, काजळ लावतात. यामुळे चेहरा खुलून दिसतो.पण दिवसभर काजळ टिकून न राहता ते स्प्रेड झाल्याने डोळ्यांच्या खाली काळे डाग दिसतात. यामुळे सौंदर्य खुलण्याऐवजी अधिकच भयाण दिसते. म्हणूनच काजळ चेहर्‍यावर पसरू नये म्हणून या काही खास टीप्स जरूर पाळा.

1.  काजळ लावण्यापूर्वी डोळ्यांच्य खालचा भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवा. तेथील ऑईल ग्लॅंड्समधून अतिरिक्त तेल बाहेर पडणार नाही याची काळजी घ्या. यासाठी काजळ लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून टॉवेलने कोरडा करून मगच डोळ्यांमध्ये काजळ घाला.

2. काजळ लावण्यापूर्वी पापण्यांवर  तसेच डोळ्यांच्या दोन्ही कडांना पावडर लावा. यामुळे त्याभागातील मॉईश्चर शोषले जाईल तसेच काजळ पसरण्यापासून तुमचा बचाव होईल. काजळ लावल्यानंतर अतिरिक्त पावडर ब्रशने पुसा.

3. डोळ्यांच्या आतील किंवा बाहेरील टोकांना काजळ लावणे टाळा. टोकांवर काजळ पसरण्याची शक्यता अधिक असते.

4. अतिरिक्त तेलामुळे डोळे डल / निस्तेज दिसण्याची शक्यता आहे. जर तुमच्या पापण्यांजवळ तेल असेल तर कापसाच्या बोळाने ते नियमित टीपा.

5. डोळ्यांवर जाडसर आयलायनर लावयचे झाल्यास  स्मज-फ्री काजळ पेन्सिल वापरा. काजळच्या क्वालिटीवरदेखील सौंदर्य अवलंबून असते. हलक्या दर्जाचे काजळ वापरल्यास त्यामुळे  डोळ्यांना इजा होण्याची, खाज येण्याची शक्यता अधिक असते.

त्यामुळे  काजळ लावताना काळजी घ्या आणि सतत  डोळ्यांना हात लावू नका. तसेच डोळे चोळू नका. यामुळे काजळ पसरण्याची शक्यता अधिक असते. तसेच यामुळे डोळ्यांचा खालचा भाग काळा होण्याची शक्यता असते. आयलायनर लावण्याच्या 6 वेगवेगळ्या पद्धती तुम्हांला ठाऊक आहेत का?

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>