Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

भातातून केवळ कॅलरीज नाही, तर हे आरोग्यदायी फायदेदेखील मिळतात !

$
0
0

Read this In English 

Translated By – Dipali Nevarekar

भारतीयांच्या आहारामध्ये ‘भात’ हा एक प्रमुख अन्नघटक आहे. प्रांतानुसार तांदळाच्या प्रकारामध्ये आणि भात बनवण्याच्या पद्धतीमध्ये बदल होतात. त्यामुळे किमान दिवसातून एकदा भात / तांदळाचा आहारात समावेश होतोच. डाएटच्या नावाखाली भात टाळावा असा समज काहींच्या मनात आहे. परंतू तांदळामध्ये अनेक आरोग्यदायी फायदेखील आहेत. त्यामुळे केवळ वजन घटवण्यासाठी भात टाळून इतर शारिरीक समस्यांना आमंत्रण देण्यापेक्षा त्याचा आहारात योग्य प्रमाणात समावेश करा.

तांदळामध्ये आढळणारे व्हिटामिन्स आणि मिनरल्स शरीरातील फ्री रॅडिकल्सचा धोका कमी करतात. यासोबतच मिळणारे व्हिटामिन बी कॉम्प्लेक्स शरीरात  केमिकल रिअ‍ॅक्शन करून अन्नाचे उर्जेमध्ये रुपांतर करतात. तांदळातील डाएटरी प्रोटीन्स शरीरातील टीश्यूचे कार्य सुधारण्यास मदत करतात.

पांढरा तांदूळ हा प्रोसेस्ड असल्याने त्यावरील आवरण काढलेली असतात. उलट लाल किंवा हातसडीच्या तांदळावरील केवळ सालं वेगळी केलेली असतात. त्यामुळे हातसडीच्या तांदळाचा भात चविष्ट आणि तुलनेत अधिक व्हिटामिन आणि मिनरल्सचा पुरवठा देणारा असल्याने पोषक ठरतो. लाल तांदळामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम यांचे प्रमाण मुबलक असल्याने हाडांचे आरोग्यही सुधारते.

तांदळाचे आरोग्यदायी फायदे असले तरीही त्यातून शरीराला कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्सचा पुरवठा होतो. त्यामुळे योग्य तांदळाचा आणि प्रमाणाचा विचार करून भात आहारात घेणेच अधिक फायदेशीर ठरते.

कॅलरीचा विचार करून भात खाणार्‍या तुमच्यासाठी खास -

  • ब्राऊन राईस: 1 कटोरी = 207.7 cal
  • वाफवलेला भात : 1कटोरी = 203.5 cal
  • जीरा राईस : 1 कटोरी = 253.2 cal
  • व्हेजिटेबल फ्राईड राईस: 1 कटोरी = 643.7 cal
  •  रिसोट्टो (Risotto) : 1 कटोरी = 559 cal
  • दही भात : 1 katori = 218.2 cal

नोट  :  हे कॅलरी काऊंट आहे वाफवलेल्या भातातील आहे. तसेच ते हेल्दीफाय मी च्या सहाय्याने केले आहे.

भाताचा आहारात समावेश करायचा झाल्यास, तो वाफवून घ्यावा. वाफवण्यामुळे भातातील पोषणद्रव्य टिकून राहण्यास मदत होते. मधूमेही तसेच वजन घटवणार्‍यांसाठी पांढर्‍या तांदळापेक्षा लाल तांदूळ आहारात घेणे अधिक फायद्याचे ठरते. लाल तांदळामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही.

पांढरा तांदूळ घेताना  तो उकडा तांदूळ घ्या. म्हणजे शिजायला अधिक वेळ लागत असला तरीही त्यात पोषणद्रव्य अधिक असतात. पण योग्य प्रमाणातच अशा प्रकारचा भात खावा.

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>