Translated By - Dipali Nevarekar
मेष -:
काही ठीक झालेल्या जुन्या शारिरीक समस्या पुन्हा नव्याने त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. पण यावेळेस त्यावर मात करणे थोडे सुकर होईल. मध्यमवयीन आणि त्याहून अधिकच्या वयोगटातील लोकांनी काही त्रासदायक लक्षणं आढळताच वेळ न दडवता मेडिकल चेकअप करून घ्या.
वृषभ -:
या आठवड्यात सांधेदुखीच्या वेदना अधिकच त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. पेन रिलिवर स्प्रे जवळ ठेवा म्हणजे वेदना वाढण्याआधीच त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. राशीतील ग्रहांची स्थिती आरोग्यासाठी प्रतिकूल असल्याने विशेष काळजी घ्या.
मिथून -:
रक्तदाब अथवा लिव्हरसंबंधित आजार असल्यास विशेष काळजी घ्या. ब्ल्यूबेरीचा आहारात समावेश करा. यामुळे या आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. आरोग्याला गृहीत धरून त्याची हेळसांड करू नका. हलका व्यायाम नियमित करा. तसेच पोषक आहाराचा समावेश करा.
कर्क -:
सांध्यांचे दुखणे, श्वसनाचे विकार असलेल्यांनी या आठवड्यात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कष्टाचे व्यायाम किंवा शारिरीक कसरती करू नका. रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी ध्यानसाधना करणे फायदेशीर ठरेल.
सिंह -:
या आठवड्यात लहानशी शारिरीक समस्यादेखील त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. पचनसंस्थेचे आरोग्य जपण्यासाठी रात्रीच्या वेळेस चमचमीत खाणे टाळा. आरोग्यदायी जीवनशैली, पुरेशी झोप,योगा आणि श्वसनाच्या व्यायामांनी आरोग्य जपण्याचा प्रयत्न करा. फार गंभीर/ त्रासदायक समस्या उद्भवण्याची फारशी शक्यता नाही.
कन्या -:
सर्दी, खोकल्यासारखे लहान आजार या आठवड्यात त्रास देण्याची शक्यता आहे. त्यावर वेळीच उपचार करा. यासोबतच मंदावलेली पचनसंस्थादेखील काळजीचे कारण ठरू शकते. काही हलके व्यायाम करणे तुम्हांला फायदेशीर ठरू शकतात. या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी काही अल्टरनेटीव्ह उपचार करावेत.
तूळ -:
तणावग्रस्त परिस्थितीचा तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. यामागील मूळ कारण शोधणे थोडे त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे योग्य तज्ञांकडून उपचार करून घ्या. व्हायरल इंफेक्शनपासून दूर रहा. योगा आणि ध्यानसाधना केल्याने तुमच्यावरील ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक -:
या आठवड्यात तुम्हांला पित्ताचा त्रास होण्याची दाट शक्यता आहे. त्यावर मात करण्यासाठी वेळीच उपचार करा म्हणजे त्यातील गुंतागुंत वाढणार नाही. जंकफूड खाणे टाळा,पुरेसा व्यायाम करा म्हणजे लहानसहान समस्या दूर ठेवण्यास मदत होईल.
धनू -:
सांध्याचे दुखणे असणार्यांनी या आठवड्यात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तदाबाचा त्रास टाळण्यासाठी तणावग्रस्त परिस्थितींपासून दूर रहा. पचनाच्या विकाराचादेखील या आठवड्यात त्रास होऊ शकतो. फीटनेस राखण्यासाठी काही हलके व्यायाम करा.
मकर -:
राशीतील ग्रहमान पाहता आरोग्यसंबंधित काही त्रास होण्याची शक्यता आहे. पचनाचा आणि श्वसनाचा त्रास असणार्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार करा.
कुंभ -:
या आठवड्यात आरोग्याची विशेष काळजी घ्या. लहानसहान समस्यादेखील वेळीच उपचार न केल्यास गंभीर होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने पचनाच्या समस्यांकडे लक्ष द्या. व्हायरल इंफेक्शन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वच्छतेची काळजी घ्या तसेच बाहेरचे खाण्यावर नियंत्रण ठेवा.
मीन -:
या आठवड्यात आरोग्याशी संबंधित समस्या उदभवण्याची शक्यता नाही. हा आठवडा अगदी ठणठणीत जाईल, त्यामुळे निश्चिंत रहा. मात्र आरोग्य जपण्यासाठी अति खाणे, अति कष्ट करणे टाळा.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock