अॅक्नेची (पिंपल्स) समस्या कमी करण्यासाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय करत असाल. परंतू ते तुमच्या त्वचेवर परिणामकारक व योग्य असतील तरच तुम्हांला अपेक्षित निकाल मिळू शकतात. पिंपल्सची तयार होण्यापूर्वी ते त्वचेवर व्हाईटहेड्स व ब्लॅकहेड्स या स्वरूपात असतात. त्वचेवरील छिद्रं अतिरिक्त तेल, सेबम किंवा मृत पेशी व बॅकटेरिया यांमुळे बंद झाल्यास ‘व्हाईटहेड्स’ तयार होतात. (घरगुती फेसपॅकने करा, मुरूमांचा समूळ नाश !)
शरीरात होणारे हार्मोनल बदल, मासिकपाळी, गर्भारपण किंवा मोनोपॉज या काळात त्वचेवर व्हाईटहेड्स निर्माण होण्याचे प्रमाण अधिक असते. हे प्रामुख्याने कपाळावर, नाकावर, गालांवर तयार होतात.
‘बेकिंग सोडा’ – व्हाईटहेड्सवर परिणामकारक उपाय
तुम्हांला ‘व्हाईट हेड्स’चा त्रास होत असल्यास त्यावर तुम्ही ‘बेकिंग सोड्या’च्या मदतीने मात करू शकता. बेकिंग सोडा त्वचेवर खोलवर जाऊन छिद्रं मोकळी करतो, अनावश्यक तेल, घाण व मृत पेशींचा थर बाजूला करतो. सोड्यामुळे त्वचेची pH पातळीदेखील राखण्यास मदत होते. याचसोबत त्वचेवरील ‘ब्लॅकहेड्स’ची समस्या हटवण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून पहा.
कसा कराल उपाय ?
- 1 टीस्पून बेकिंग पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट करावी.
- ही पेस्ट त्वचेवर आवश्यक ठिकाणी लावून काही मिनिटांत चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा.
- अधिक चांगले परिणाम मिळवण्यासाठी हा प्रयोग दिवसांतून 2-3 वेळा करावा.
Translated By - Dipali Nevarekar
Source - baking-soda-paste-for-whiteheads
छायाचित्र सौजन्य : Shutterstock
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी , मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा.