आज आषाढी एकादशी असल्याने अनेक विठ्ठल-भक्तांचे उपवास असतो. काही जण हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडतात. उपवास असला तरी भूक लागतेच. म्हणून संध्याकाळच्या नाश्त्याला झटपट तयार होणारे हे कटलेट्स नक्की करा.
साहित्य –
- उकडलेली कच्ची केळी
- उकडलेला बटाटा
- वरीचे पीठ
- हिरव्या मिरच्यांची पेस्ट
- काजूचे तुकडे
- मीठ
- शेंगदाण्याचा कूट
- लिंबाचा रस
- तूप
कृती -
- एका बाउलमध्ये उकडलेली कच्ची केळी, उकडलेला बटाटा, हिरव्या मिरच्यांची पेस्ट, शेंगदाण्याचा कूट, मीठ, लिंबाचा रस, काजूचे तुकडे या सर्वांचे मिश्रण एकजीव करून घ्यावे.
- या मिश्रणाचे चपटे कटलेट्स तयार करून घ्यावेत.
- तयार झालेले कटलेट्स वरीच्या पीठात घोळवून शॅलोफ्राय करावेत.
उपवासाच्या कटलेट्सची कृती प्रत्यक्ष पाहण्यासाठी खालील व्हिडियोवर क्लिक करा.
छायाचित्र सौजन्य – shutterstock
Video Source – Zee marathi / You tube channel
संबंधीत दुवे –
उपवास विशेष रेसिपी : केळाच्या साटोऱ्या
उपवास विशेष रेसिपी : कंदमुळांची टिक्की
उपवास विशेष रेसिपी : राजगिऱ्याचा डोसा
आषाढी एकादशी विशेष : हेल्दी आणि टेस्टी ‘मूगडाळीची खीर’
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा.