Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

‘बीपी लो’झाल्यास करा हे प्रथमोपचार !

$
0
0

Read This in English

Translated By  -  Dipali Nevarekar

हायपोटेंशन म्हणजेच रक्तदाब कमी होण्याच्या समस्येकडे हायपरटेंशन ( रक्तदाब वाढणे) इतके लक्ष दिले जात नसले तरीही त्यातून आजाराची गुंतागुंत वाढण्याची शक्यता अधिक असते. रक्तदाब कमी झाल्यास मरगळ / निस्तेज वाढणे, मळमळणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षण आढळतात. अचानक रक्तदाब कमी झाल्यानंतर नेमके काय करावे हे अनेकांना सुचत नाही. म्हणूनच अक्षज्योत क्लिनिकचे क्रिटिकल केअर स्पेशॅलिस्ट आणि फिजिशियन डॉ. अक्षय चाल्लानी यांनी सांगितले आहे.

पाठीवर झोपा :

अचानक डोळ्यांसमोर अंधार येणे, गरगरल्या सारखे वाटल्यास ताबडतोब पाठीवर झोपा. काहीवेळ डोळे बंद करून शांत पडून रहा.

 ORS घ्या :

ओरल रिहायड्रेशन सॉल्ट (ओआरएस ) शरीराला पुन्हा रिहायड्रेट करायला मदत करतात. तसेच मीठ आणि इलेक्ट्रोलाईट्सचा पुरवठा करतात. बाजारात मिळणारी ओआरएसची पाकीट जवळ ठेवा. व त्याप्रमाणे मिश्रण बनवून प्या. मात्र मधूमेहींनी  तयार ओआरएस पावडर  पाण्यात मिसळून पिणे टाळा. यामध्ये साखरेचादेखील समावेश असतो.

पाणी प्या : 

तुमच्याजवळ ओआरएस नसल्यास पाणी प्या. त्यामध्ये चिमुटभर मीठ आणि चमचाभर साखर मिसळा. मीठातील सोडीयम रक्तदाब सुधारेल. तर साखर ग्लुकोज वाढवायला मदत करेल.

मीठ चाखा : 

रक्तदाब कमी झाल्यास मीठ चाखणे किंवा खारी बिस्किटं खाणं हा उपाय अनेकजण करतात. यामुळे रक्तदाब सुधारण्यास मदत होते. यासोबत तुम्ही साखर-मीठाचे पाणी पिऊ शकतात. पण हे अति करू नका. यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. (नक्की वाचा : आहारातील मीठाचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी पाळा ही ’5′ गुपितं !)

रक्तदाब स्थिरावल्यानंतर तसेच तुम्हांला सामान्य वाटत असले तरीही डॉक्टरांना त्वरीत भेटा. तसेच नेमके कशामुळे रक्तदाब कमी झाला हे जाणून घ्या. अनेकदा ही समस्या लहान स्वरूपात असताना त्याकडे दुर्लक्ष करतात  आणि अचानक त्रास वाढल्यास डॉक्टरांचा धावा करतात. रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्यास नियमित ते तपासून घ्या. 110/60 mm Hg पेक्षा कमी झाले तरीही अनेकदा त्याची लक्षण आढळून येत नाहीत. त्यामुळे त्रास जाणवत असल्यास स्वतःची औषाध स्वतः निवडण्यापेक्षा डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या.

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>