Read This in English
Translated By - Dipali Nevarekar
‘संदेश’ हा बंगाली मिठाई मधील लोकप्रिय आणि चविष्ट मिठाईचा प्रकार आहे. पनीरपासून बनविण्यात येणारा हा पदार्थ विविध स्वादानुसारदेखील बनवता येतो. जर तुम्ही कॅलरी कॉन्शियस असाल तर लो फॅट पनीर आणि फळांना मिसळूनदेखील ‘संदेश’ बनवू शकतात. हिवाळ्याच्या दिवसात संत्र आणि स्ट्रॉबेरी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने याचा वापर करून नेहमीच्या मिठाईला थोडा हेल्दी ट्विस्ट द्या.
बनवायला लागणारा वेळ – 5 मिनिटं
तयारीसाठी लागणारा वेळ – 5 मिनिटं
किती संदेश बनवू शकाल – 4
- साहित्य -:
संदेश बनवायला लागणारे साहित्य
सुमारे अर्धा लीटर लो फॅट दूधाचे पनीर
4 टीस्पून साखर
2 टीस्पून स्किम्ड मिल्क पावडर
1 टेबलस्पून लो फॅट दूध
- सजावटीसाठी
1/4 कप चिरलेली फळं
- ऑरेंज सॉस साठी
1/3 कप ताजा संत्र्याचा रस
1/4 टीस्पून कॉर्नफ्लॉवर
1 टीस्पून साखर
2 -3 थेंब लिंबाचा रस
कृती -
संदेश कसा बनवाल ?
- पनीर,साखर, मिल्क पावडर आणि दूध एकत्र करून त्याची पेस्ट बनवा.
- या पेस्टचा 4 ” ( 100 मिमी) चे गोळे करून अर्धा तास सेट करायला ठेऊन द्या.
त्यानंतर, ऑरेंज सॉस बनवण्यासाठी केलेला ताजा रस, कॉर्नफ्लॉवर, लिंबाचा रस व साखर एकत्र करून पातेल्यात गरम करा. साखर या मिश्रणात विरघळल्यानंतर गॅस बंद करा. त्यानंतर हे मिश्रण थंड होऊ द्या.
संदेशना चिरलेल्या फळांनी सजवा. किंवा त्यावर तयार सॉस घालून तुम्ही ते सर्व्ह करू शकता.
या फ्रुट संदेशची न्युट्रीशनल व्हॅल्यू -
Amt | Energy | Protein | Cho | Fat | Vit A | Vit C | Calcium | Iron | F. Acid | Fibre |
47 gm | 93 kcal | 6.1 gm | 16.9 gm | 0.1 gm | 216.2 mcg | 9.3 mg | 220.9 mg | 0.4 mg | 0.0 mcg | 0.1 gm |
आहारात फळांचा समावेश असणे आवश्यक आहे. मात्र फळं खाताना सार्याच फळांच्या साली फेकून देऊ नका. कारण या 7 फळांच्या सालीमध्ये काही आरोग्यदायी गुणधर्मदेखील असतात.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock ( सदर चित्र प्रातिधिनिक स्वरूपात आहे) .
Original Source - Tarla Dalal