Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

लहान मुलांमधील घोरण्याच्या समस्येमागे दडलीत ही ’8′कारणं

$
0
0

Read This in English 

Translated By  -  Dipali Nevarekar

मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांनादेखील झोपेचे विकार असतात. सुमारे 12 % लहान मुलांना घोरण्याची सवय असते तर 2 % मुलांना स्लीप अ‍ॅप्नियाचा त्रास असतो. घोरणे म्हणजे पडजीभेचा श्वासासोबत आत घेतल्या जाणार्‍या हवेशी घर्षण होणे. तर स्लीप अ‍ॅप्निया म्हणजे नकळत श्वास घेण्याची प्रक्रिया थांबणे. घोरण्यामुळे नकळत काही वेळ श्वास थांबतो. त्यामुळे मुलांमध्ये ही समस्या दिसून आल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घोरण्याच्या समस्येतून ‘विनाशस्त्रक्रिया’ सुटका मिळवण्यासाठी हे व्यायाम नक्की करा. 

                                     फोर्टीस मेमोरिअल रिसर्च इन्स्टिट्युय, नवी दिल्लीचे डिरेक्टर डॉ. अतुल मित्तल यांनी लहान मुलांमधील घोरण्याची काही कारणं आणि त्यातील गुंतागुंत याबद्दल दिलेली ही विशेष माहिती -

लहान मुलं का घोरतात ? 

श्वसनमालिकेत अडथळा निर्माण होणं हे घोरण्यामागील किंवा स्लिप अ‍ॅप्नियामागील एक प्रमुख कारण आहे. यामुळे फुफ्फुसांपर्यंत पुरेशी हवा किंवा ऑक्सिजन जात नाही. यामध्ये  दोन प्रकार असतात. अप्पर एअरवे ऑबस्टक्शन  आणि लोअर एअरवे ऑबस्टक्शन.  अप्पर अएरवे ऑबस्टक्शनमध्ये नाक, ओठ ते घशातील स्वरयंत्राच्या पोकळीपर्यंत अडथळा आढळतो. अशा परिस्थितीमध्ये काहीवेळेस मेडिकल इमरजन्सीदेखील उद्भवू शकते. तर लोअर एअरवे ऑबस्टक्शन  हे स्वरयंत्रापासून खाली फुफ्फुसातील लहानशा पॅसेज वे दरम्यान आढळते.

  1. अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन : माशीच्या डंखाचा,औषधांचा,काही विशिष्ट पदार्थांच्या सेवनाने तुमच्या मुलांना त्रास होत असल्यास काळजी घ्या. यामुळे घशात सूज येते परिणामी श्वास घेण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.
  2. धूर : आगीमुळे होणार्‍या धुराच्या ठिकाणी श्वास घेतल्यास त्रास होऊ शकतो. तसेच फुगा, कॉइन्स, खेळणी, बटन्स किंवा शेंगदाणा जळल्यास होणारा धूर मुलांना त्रासदायक ठरू शकतो. यामुळे श्वसनप्रक्रियेत अडथळा निर्माण होतो.
  3. ब्रोन्कायटीस : फुफ्फुसापर्यंत ऑक्सिजन किंवा हवा पुरवणार्‍या वाहिनेमध्ये दाह होत असल्यास झोप बिघडू शकते.
  4. अ‍ॅडॅनॉडीसची वाढ : अ‍ॅडॅनॉईड्स म्हणजे घशाच्या मागील बाजूस काही मांसल भागाची वाढ  होते. यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. सोबतच कानाचे विकारदेखील वाढतात.
  5. टॉन्ससिल्स : टॉन्ससिसनमध्ये दाह होत असल्यास वाढलेल्या टॉन्ससिल्समधून श्वास घेणे त्रासदायक ठरते. यामुळे स्लीप अ‍ॅप्नियाचा त्रास होऊ शकतो.
  6. इंफेक्शन किंवा इजा : श्वसनमार्गात व्हायरल किंवा बॅक्टेरियल इंफेक्शन झाले असल्यास लहान मुलांमध्ये घोरण्याची समस्या वाढते.
  7. थ्रोट इंफेक्शन : थ्रोट इंफेक्शन  दरम्यान किंवा नंतर मागील टीश्यूजवळ  पस (पू) जमा झाल्यास स्लीप अ‍ॅप्नियाचा त्रास होतो.
  8. अस्थमा : श्वसनमार्गामध्ये दाह होणं किंवा सूज येणं यामुळे फुफ्फुसात हवा आत घेण्याचे प्रमाण कमी होते.

या समस्येवर वेळीच उपचार करणे का गरजेचे आहे ? 

रात्रीच्या वेळेस मुलांना झोपण्यास त्रास होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही समस्या गंभीर स्वरूप घेण्याआधीच त्यावर उपचार करणे आवश्यक आहे. स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती सुधारण्यासाठी मुलांना पुरेशी झोप मिळणे आवश्यक आहे. तसेच यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते, रक्तदाब नियंत्रणात राहतो. झोप पूर्ण न झाल्यास कार्बोहायड्रेट रिच पदार्थ खाण्याची इच्छा वाढते. यामुळे मुलांमधील लठ्ठपणादेखील वाढतो. अपुर्‍या झोपेचा मुलांच्या सर्वांगिण विकासावर परिणाम होतो. (नक्की वाचा  : मुलांची स्मरणशक्ती वाढवणारे ’5′ स्मार्ट पर्याय !)
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


 

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>