गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा (पीसीपीएनडीटी) भंग केल्याप्रकरणी आयुर्वेदीक वैद्य डॉ. बालाजी तांबे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईसाठी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. डॉ. तांबे यांच्या ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ पुस्तकातील काही मजकुरामुळे त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. पण आयुर्वेदात सांगितलेल्या ‘पुसंवन’ संस्काराचा समाजाने त्यांच्या फायद्यासाठी केवळ संकुचित वापर केला. म्हणूनच आयुर्वेदीक तज्ञांकडून थोड्या विस्ताराने जाणून घ्या नेमका का संस्कार नेमका काय आणि कसा केला जात असे ?
- पुंसवन विधी केवळ पुत्रप्राप्तीचा मार्ग आहे का ?
षोडससंस्कारापैकी एक म्हणजे ‘ पुसंवन’ संस्कार. हा संस्कार धार्मिक नसून बाळाच्या निकोप आणि व्यवस्थित वाढीसाठी केला जात असे. मात्र भारतातील पुरूषप्रधान संस्कृतीने या संस्कारातून केवळ पुत्रप्राप्तीसाठी याचा अधिकाधिक वापर केला. पुसंवन विधीच्या माध्यमातून बाळाची योग्य वाढ तसेच मुलगा किंवा मुलीची इच्छेनुसार निवड करता येत असे आयुर्वेदाच्या अनेक ग्रंथात स्पष्ट असल्याचे लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालयाचे डॉ. पवन लढ्ढा यांचे मत आहे. केवळ पुत्रप्राप्तीच्या हव्यासापायी लोकं हा विधी करत असल्याचे उघड झाल्याने सरकारने यावर बंदी घातली आहे. आता हा विधी करणे अवैध आहे.
पुसंवन हा केवळ मुलाच्या जन्मासाठी नव्हे तर या विधीमुळे मुलीचादेखील जन्म होऊ शकतो असे सायन आयुर्वेदीक रुग्णालय आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य व वैद्य रजनी पाटणकर यांनी सांगितले आहे. त्यांच्यामते हा संस्कार बाळाच्या विचार करणार्या स्त्रियांमध्ये ती गर्भवती राहण्याच्या आधीपासून ते सुरवातीच्या 1-2 महिन्यात केला जात असे. तसेच या विधीमुळे सुमारे 92% सकारात्मक निकालही मिळत असे. मात्र आता यावर सरकारने कायदेशीर बंदी घातली आहे.
मुलगा किंवा मुलगी याहीपेक्षा एका सुदृढ बाळाला जन्म देण्यासाठी अधिक प्रयत्न करा.मात्र मुलगा होणार की मुलगी ही उत्सुकता तुमच्या मनात असेल तर ती शमवण्यासाठी या काही रंजक पद्धती नक्की पहा. तसेच गर्भारपणातील हे काही गमतीशीर गैरसमज दूर सारून आई होणं या अनुभवाचा आनंद घ्या.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock