Read in Enligsh
Translated by Sushantdeep Sagvekar
2015 हे वर्ष बाबा रामदेवच्या पतांजली आर्युवेदासाठी काही चांगले नाही गेले. हरिद्वार मधील लोकांना पतांजलीच्या देसी घीमध्ये बुरशी मिळाली. सोमवारी अन्न संरक्षक अधिकाऱ्यांनी तुपाचे नमुने रुद्रापुरला पुढील चाचणीसाठी पाठविले आहेत.
भद्राबाद फेज-2 मधील बहुतेक लोकांना पतांजली तुपामध्ये बुरशी आणि अशुद्धता मिळाली, या तक्रारीनंतर तेथील नमुने चाचणी करीता पाठविण्यात आले आणि नमुन्याचा रिपोर्ट पंधरादिवसात मिळण्याची शक्यताआहे.
बाबा रामदेवचे सहकारी, बाळकृष्ण यांनी हे आरोप फेटाळले आहेत, त्यांच्यानुसार पतांजलीचे तुप हे उच्च तापमानावर गरम केले जाते आणि सीलबंद बाटलीत ठेवले जाते, म्हणुन बुरशी असणे चुकीचे आहे.
काही महिन्यापुर्वी Food Safety Standards Authority of India (FSSAI) विभागाने पतांजली आटा नुडल्सच्या गुणवत्ता आणि सुरक्षेबाबत प्रश्न उद्भवला होता आणि पतांजलीने आटा नुडल्स बाजारात आणण्यापुर्वी त्याच्यांकडुन मान्यता मिळवली नव्हती. त्याचे नमुने चाचणीकरता पाठविण्यात आलेले आहेत, पण रिपोर्ट अजुन आलेला नाही.
त्यानंतर हरयाणाच्या एका व्यक्तीने पतांजली आटा नुडल्सच्या पॅकेटमध्ये किडे मिळाले अशी तक्रार नोंदविली होती. नरवाणाच्या स्वदेशी दुकानातुन हे पॅकेट खरेदी केले होते आणि दुकानदारानेसुद्धा त्याच्याकडुन ते विकत घेतल्याचे मान्य केले होते. त्या व्यक्तीने पतांजली विरोधात दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्याने दावा दाखल केला आहे अशी कोणतीही बातमी आली नाही आणि पतांजलीनेही याबाबतीत काही वक्तव्य केले नाही.
चित्र सोत: Shutterstock