Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

साप्ताहिक भविष्य आरोग्याचे (28 डिसेंबर – 3 जानेवरी )

$
0
0

Translated By  -  Dipali Nevarekar

मेष -: 

या आठवड्यात  तुम्हांला सर्दी-पडशाचा त्रास होण्याची शक्यता आहे. काही दिवसात हा त्रास कमी होईल. मात्र मध्यमवयीन किंवा त्याहून अधिकच्या वयोगटातील लोकांनी त्याकडे दूर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.

वृषभ -: 

सर्दी,खोकल्याचा त्रास वगळता अन्य गंभीर शारिरीक समस्या उद्भवण्याची शक्यता नाही. अस्थमा, सांधेदुखीचा त्रास असलेल्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. वेळेवर औषधं आणि फिजियोथेरपीचा सराव केल्यास तुम्ही ठणठणीत रहाल.

मिथून -: 

राशीतील ग्रहमान पाहता या आठवड्यात तुम्हांला अनपेक्षितरित्या अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हांला काही दिवस सक्तीचा आराम करणे भाग आहे. रक्तदाबाचा त्रास असल्यास त्यावर नियंत्रण ठेवा.

कर्क -:

राशीतील ग्रहांची प्रतिकुलता पाहता, मधूमेह, रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष  काळजी घेणे आवश्यक आहे.  मेडिकल चेकअप करून त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. शारिरीक कामं करताना काळजी घ्या. तुमच्या खांद्याला दुखापत होऊन तो निसटण्याचा / डिसलोकेट होण्याची शक्यता आहे.

सिंह-: 

हा आठवडा तुमच्यासाठी अगदी ठणठणीत राहील. तुमचे आरोग्य स्वास्थ्यकारक राहील. मात्र हे गृहीत धरून आरोग्याची हेळसांड करू नका. घातक व्यसनांचा त्याग करा. तसेच   नियमित व्यायाम करा.

कन्या -:

हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने ठिकठाक राहील. श्वसनाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच चाचण्या करून औषधोपचार सुरू करा. समस्या अधिक गंभीर झाल्यास त्रासदायक ठरेल. योगा आणि ध्यानसाधना करून फ़ीटनेस राखण्याचा प्रयत्न करा.

तूळ-: 

आरोग्याच्यादृष्टीने काही अनपेक्षित समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. मात्र हा त्रास काहीकाळ राहील. त्रासदायक व्यसनांचा वेळीच त्याग करा. योगा आणि ध्यानसाधना करून तुमच्या फिटनेस राखण्याचा प्रयत्न करा.

वृश्चिक -: 

या आठवड्यात आरोग्यविषयक समस्या तुमच्यापासून दूर राहतील. मात्र अपघाताने इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीममध्ये, शारिरीक कसरती करताना किंवा खेळताना काळजी घ्या. तसेच योगा आणि पोषक आहाराचा दैनंदिन जीवनात समावेश करून रोगप्रतिकारशक्ती व स्टॅमिना वाढवा.

धनू -: 

तुमच्या राशीतील ग्रहमानाची अनुकुलता काही जुन्या आजारांवर योग्य औषधं मिळवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. सर्दी-खोकल्याचा त्रास होईल पण तो फारसा चिंतादायी नसेल.  आरोग्यदायी जीवनशैली तसेच नियमित व्यायाम करून आरोग्य निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा.

मकर -: 

मध्यमवयीन आणि त्याहून अधिकच्या वयोगटातील लोकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा त्रासदायक जाण्याची शक्यता आहे. काही जुने त्रास पुन्हा नव्याने डोके वर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. इतरांचे आरोग्य ठीकठाक  राहील.

कुंभ -: 

या आठवड्यात आरोग्याच्या दृष्टीने चिंतेचे काहीच कारण नाही. निरोगी स्वास्थ्यामुळे तुम्ही प्रसन्न रहाल. मात्र काहींना ऋतूमानात होणार्‍या  बदलांचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वातावरणात होणार्‍या बदलांकडे पाहून आहार-विहार निवडा.

मीन – : 

हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने फारसा चिंतादायी नाही. मात्र सांधेदुखीच्या रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक आहे. वेदना अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्यमवयीन आणि त्याहून अधिकच्या वयोगटातील लोकांनी या वेदना कमी करण्यासाठी परिणामकारक अल्टरनेटीव्ह औषधांचा वापर करावा.

GaneshaSpeaks-Logo1

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>