Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

लसूण- श्वसनविकारांना दूर ठेवणारा रामबाण घरगुती उपाय !

$
0
0

         Read this in English

Translated By -Dipali Nevarekar

 लसूण हा भारतीय आहारात प्रामुख्याने वापरला जाणारा घटक. लसणामुळे पदार्थांना चव येते तसेच त्यातील औषधी गुणधर्मांमुळे अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठी प्रथमोपचार म्हणून घरगुती उपायांमध्ये लसूण वापरली जाते. लसणामुळे श्वसनाचे विकार दूर ठेवण्यास मदत होते. सर्दी,खोकला, अस्थमा, टी.बी ते न्युमोनियासारख्या आजारांना दूर ठेवण्यासाठी लसूण फायदेशीर ठरते. (नक्की वाचा : ‘जलनेती’- श्वसनविकारांना दूर करणारा घरगुती उपाय )

श्वसनविकारांत लसूण कसे ठरते फायदेशीर ?

लसणामुळे जुनाट श्वसनविकारांत आराम मिळण्यास मदत होते. लसणातील घटक बॅक्टेरिया आणि फंग़सचा नाश करण्यात यशस्वी ठरते. त्यामुळे लसणाचा आहारात समावेश करा. यामुळे व्हायरल इंफेक्शन दूर राहण्यास मदत होते. लसणातील अलिसिन नामक अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक थ्रोट इंफेक्शनपासून बचाव करण्यास मदत करतात. तसेच अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकचे इंफेक्शन दूर करण्यास मदत करते.

लसणामुळे सर्दी दूर करण्यास मदत होते. तसेच फुफ्फुसाचे विकार,  श्वास घेण्यास होणारा त्रास, अस्थमा हे आजार दूर करण्यास मदत होते. संशोधनातून समोर आलेल्या अहवालानुसार नियमित आठवड्यातून दोनदा लसूण खाल्ल्यास फुफ्फुसाच्या कर्करोगाची शक्यता कमी होते. श्वसनमार्गात होणारा त्रास,खाज, खवखव दूर करण्यासाठी लसूण फायदेशीर ठरते. जुनाट ब्रोनकाईटीसचा त्रास दूर करण्यासाठीदेखील लसूण वापरणे फायदेशीर ठरते. अशा आजारांवर लसूण परिणामकारक ठरते.

टीप्स :

  • आहारामध्ये डाळ/ आमटी/ भाजी किंवा चटणीमध्ये चिरलेला किंवा ठेचलेला लसूण जरूर वापरा.
  • लसणाचा काढा :  गवतीचहाची पाती व काही लसणाच्या पाकळ्या ठेचून कपभर उकळत्या पाण्यात मिसळा. मिश्रण गाळून हा काढा प्यायल्यास घश्यातील खवखव आणि कफाचा त्रास दूर होण्यास मदत होईल.

संदर्भ  -

Garlic – WebMD

Paul Bergner – The Healing Power of Garlic

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>