Read This in English
Translated By – Dipali Nevarekar
मी लवकरच पहिल्यांदा सेक्स करणार आहे. पण माझ्या बिकनी एरियावरील केसांबाबत मला लाज वाटतेय. सेक्स करण्यापूर्वी ते काढून टाकणे गरजेचे आहे का ? तसेच सुरक्षित आणि योग्य पर्याय कोणता आहे हेदेखील सुचवा .
बिकनी एरियावरील केस काढावेत की नाही हा प्रश्न आजकाल अनेक तरुण जोडप्यांना पडतो. मात्र त्याचे दडपण न बाळगता त्याबद्दल तुमच्या साथीदाराशी बोला. त्याला ही गोष्ट गरजेची वाटतेय का ते आधी पहा.त्याचे उत्तर ‘हो’ असल्यास शेविंग किंवा वॅक्सचा पर्याय निवडा. बिकनी एरियाजवळील केस काढण्यासाठी ‘हेअर रिमुव्हर क्रिमचा’ वापर मूळीच करू नका. यामुळे इंफेक्शनचा धोका असतो. तसेच योनीमार्गाच्या आरोग्यासाठी या काही गोष्टी करणे टाळा. तसेच शेव्हिंग आणि वॅक्सिंग करताना पुरेशी काळजी घ्या. तसेच स्त्रियांनी पहिल्यांदा सेक्स करताना या गोष्टींची काळजी घेणे देखील आवश्यक आहे.
शेव्हिंग केल्यानेदेखील वर्जायनल इंफेक्शन होण्याचा धोका असतो. रेझर,ब्लेडची निवड सांभाळून करा.पुरेशी स्वच्छता बाळगा. त्याजागी एखादी जखम होणेदेखील खूप त्रासदायक ठरू शकते. इंफेक्शनचा धोका आहेच पण त्यासोबतच जखम सांभाळणेदेखील कठीण होऊ शकते. काही ब्युटी पार्लरमध्ये बिकनी एरियामधील केस काढण्यासाठी खास पॅकेज असतात. ‘ब्राझिलियिन वॅक्स’ने त्या भागाजवळील केस काढले जातात. मात्र त्यासाठी योग्य ब्युटी पार्लरची निवड करा. हा निर्णय घेण्यापूर्वी स्त्रीरोगतज्ञ किंवा डरमॅटोलॉजिस्टचा सल्ला अवश्य घ्या. त्यानंतरच निर्णय पक्का करा.
योनिमार्गाजवळील केस पूर्णपणे काढून टाकण्यापेक्षा त्यांना छाटणे / ट्रिम करणे हा उपाय अधिक सुरक्षित आणि फायदेशीर आहे. या केसांमुळे योनिमार्गाला बॅक्टेरियाचा धोका होत नाही. त्यामुळे इंफेक्शनचा त्रासही दूर राहतो. इंफेक्शनच्या काळात सेक्स करणे टाळा. यामुळे तुमच्या साथीदारालादेखील त्याचा प्रसार होऊ शकतो. सेक्सशिवायदेखील होऊ शकते या लैंगिक आजाराची बाधा त्यामुळे दोघांनीही पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे.
छायाचित्र सौजन्य – Getty Images