Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

पेर –हॅंगओव्हरमधून बाहेर पडण्याचा नैसर्गिक उपाय !

$
0
0

Read this in English 

Translated By – Dipali Nevarekar

डिसेंबर महिना म्हटला की ख्रिसमस आणि न्यू -इयरच्या पार्ट्या रंगणारच. या काळात लग्नसराईचीही धूम असते. मग नॉन-व्हेज फूडवर ताव मारत अल्कोहलयुक्त पेय पिणे अनेकांसाठी अटळ असते. दारूच्या  अशा रंगणार्‍या रात्रींमुळे दुसर्‍या दिवशी हॅगओव्हरचा त्रास होऊ नये म्हणून आधीच काळजी घेता येऊ शकते.

हॅगओव्हरमुळे होणारी डोकेदुखी किंवा त्रास दूर ठेवण्यासाठी पेर / नाशपाती अत्यंत फायदेशीर आहे. पार्टीला जाण्याआधी तुम्ही पेर खाऊन गेल्यास त्यामुळे हॅगओवरचा त्रास कमी होऊ शकतो. ‘कॉमनवेल्थ सायन्टिफिक आणि इंडस्ट्रिएल रिसर्च ऑर्गनायझेशन’च्या मते, दारू पिण्याआधी पेर ज्युस किंवा पेर खाल्यास हॅगओव्हरचा त्रास कमी होण्यास मदत होते.

का ठरते पेर फायदेशीर ?

अल्कोहलयुक्त पेयाच्या सेवनाने शरीर डीहायड्रेट होते तसेच इलेक्ट्रोलेटचे  प्रमाण कमी होते.  पेरमधील साखरेमुळे इलेक्ट्रोलेट्ससोबतच साखरेचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. पेरमधून शरीराला व्हिटामिन सीचा पुरवठा होतो. यामुळे शरीरातील कमी झालेल्या पोषणद्रव्यांची झीज भरून निघते. परिणामी हॅगओव्हरचा त्रास होण्याचे प्रमाणही कमी होते. पेरमधील मॅग्नेशियम घटक डोकेदुखीचा त्रास कमी करतात, रक्तवाहिन्या मोकळ्या करतात  यामुळे शरीर रिलॅक्स होण्यास मदत होते. पेरमुळे  मळमळ व मनाची अस्थिरता कमी होण्यास मदत होते. त्यामुळे हॅगओव्हरचा त्रास कमी होण्यास मदत होते आणि दुसर्‍या दिवशी सकाळी तुम्ही पुन्हा नव्याने कामाला लागू शकता.

  कसा कराल हा उपाय  ?

हॅगओव्हरचा त्रास टाळण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी पेर खावे.

तुम्ही दारूच्या नशेत असाल तर त्याला कमी करण्यासाठी हा घरगुती उपाय करा. तसेच ग्लासभर पाणी आणि सोबत  पेर / त्याचा रस प्या. यामुळे तुम्ही दुसर्‍यादिवशी तुम्ही पुन्हा ताजेतवाने होऊन उठाल.

पेरचा फ्रेश रस बनवण्यासाठी पेरचे काही तुकडे,पाणी, मध आणि आलं एकत्र मिक्सरमध्ये वाटा.

यामुळे हॅंगओव्हरचा त्रास कमी होण्यास मद्त होईल.

 

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>