Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

हेल्दी टेस्टी ख्रिसमस रेसिपी –‘अ‍ॅपल –सिनॅमम मफिन्स’

$
0
0

ख्रिसमस आणि पाठोपाठ येणारे नववर्ष यामुळे सगळीकडेच चैतन्याचं आणि सेलिब्रेशनचा मूड असतो. आणि हे सेलिब्रेशन केक, मफिन्स आणि कुकीजशिवाय अपूर्णच वाटतं. मग प्रत्येकवेळी विकतचे मफिन्स आणण्यापेक्षा यंदा घरगुती मफिन्सनी ख्रिसमस साजरा करून पहा.

नव्या वर्षाची सुरवात तुम्हांला हेल्दी नोट वर करायची असेल तर चॉकलेट मफिन्सना बगल देऊन थोडा हेल्दी आणि टेस्टी देऊन पहा. थंडीच्या दिवसात मुबलक आढळणारी सफरचंद वापरून तुम्ही ‘ अ‍ॅपल सिनॅमम’ मफिन्स बनवू शकतात. सफरचंदाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तर सिनॅमम म्हणजेच दालचिनी चवीला तिखट -गोड लागणारा मसाल्याचा एक पदार्थ त्वचाविकार दुर करण्यासोबत संसर्ग दूर करण्यास मदत करतात.

साहित्य -: 

  • साल काढून चिरलेले 2 मध्यम आकारातील सफरचंद
  • मध– 3 टेबलस्पून
  • तेल – 4 टेबलस्पून
  • गव्हाचे पीठ  – 1 कप
  • बेकिंग पावडर – 1 टीस्पून
  • दूध  – 1/2 कप
  • ब्राऊन शुगर– 1 टेबलस्पून
  • दालचिनीची पावडर – 1/2 टेबलस्पून

कृती -: 

  • ओव्हन 180 डिग्रीवर प्रिहिट करा.
  • मफिन्स ट्रेला ग्रिसिंग करून बाजूला ठेवा.
  • एका पातेल्यामध्ये सफरचंदाचे तुकडे, बेकिंग पावडर, तेल, मध व गव्हाचे पीठ एकत्र करा.
  • यामध्ये दूध मिसळून मिश्रण एकत्र करा. मिश्रण अगदीच घट्ट वाटल्यास त्यात थोडं दूध मिसळा.
  • एका वाटीमध्ये ब्राऊन शुगर आणि दालचिनीची पूड एकत्र करा.
  • चमच्याने किंवा आईस्क्रिम स्कुपने तयार मिश्रण मफिन्स मोल्डमध्ये घाला.
  • त्यावर दालचिनी आणि ब्राऊन शुगरची पावडर भुरभुरा.
  • मफिन्सचा ट्रे 12 मिनिटे ओव्हनमध्ये ठेवा.
  • टूथपिकच्या सहाय्याने मफिन्स पूर्ण शिजलेत का हे तपासून पहा.
  • मोल्डमधून बाहेर काढण्याआधी हे थोडे थंड होऊ द्या.

तयार मफिन्स संध्याकाळच्या नाश्त्याला किंवा मधल्या वेळेस लागणार्‍या भूकेच्या वेळी देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तसेच आबालवृद्धांसाठी हा पदार्थ सार्‍यांनाच आवडेल. मग यंदा तुम्हीही करून पहा ‘अ‍ॅपल मफिन्स’ आणि त्याचा फीडबॅक नक्की कळवा.

द हेल्थसाईट कडून ख्रिसमस  आणि नव्या वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !! 


Image: Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source –  Healthy recipe — Apple cinnamon muffins

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>