मेष-:
या आठवड्यात तुमचे आरोग्य अगदी ठणठणीत राहील. मात्र सर्दी,खोकल्याचा त्रास होऊ शकतो. मध्यमवयीन किंवा वृद्ध लोकांनी या आठवड्यात काळजी घेणे आवश्यक आहे. काही फिजिकल अॅक्टिव्हिटी करताना इजा होण्याची शक्यता आहे. तसेच त्यातून बाहेर पडण्यासाठी सामान्य वेळेपेक्षा अधिक काळ जाण्याची शक्यता आहे.
वृषभ-:
या आठवड्यात आरोग्याची चिंता करण्याची काहीच गरज नाही. हा आठवडा तुमच्या स्वास्थ्यासाठी उत्तम आहे. पण म्हणून आरोग्य गृहीत धरू नका. पोषक आहार, योग्य व्यायाम, जीवनशैलीत सकारात्मक बदल करा. तसेच किमान आठवड्यातून चार दिवस व्यायाम करा. यामुळे निरोगी स्वास्थ्याबरोबरच मानसिकदृष्ट्यादेखील तुम्ही फीट रहाल.
मिथून -:
तुमच्या राशीतील ग्रहमान पाहता, सांधेदुखी किंवा आर्थ्राईटिसचा त्रास असणारे वगळता इतरांचे आरोग्य उत्तम राहील. काही जुनाट विकार असणार्यांनी आवश्यक काळजी आणि वेळेवर औषधं घेणं गरजेचे आहे. अन्यथा समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. हलके-फुलके व्यायाम करा.
कर्क -:
तुमच्यासाठी हा आठवडा आरोग्यदायी आहे. जुन्या विकारांवर वेळीच अल्टरनेटीव्ह उपाय शोधा. तसेच बदलत्या ऋतूमुळे आरोग्य बिघडणार नाही. याची काळजी घ्या. आऊट-डोअर खेळ खेळताना काळजी घ्या. इजा होण्याची शक्यता आहे.
सिंह-:
बदलत्या ऋतूमानामुळे या आठवड्यात तुम्ही व्हायरल फिवरमुळे आजारी पडण्याची शक्यता आहे. तसेच त्यामुळे काही दिवस घरीच सक्तीचा आराम करावा लागेल. त्यामुळे शरीराकडून मिळणार्या संकेतांकडे लक्ष द्या. तसेच सुरवातीच्या ट्प्प्यांतच लक्षणांवर नियंत्रण मिळवा. तसेच आहारतज्ञांच्या योग्य डाएटची निवड करा.
कन्या -:
सर्दी, कफ, खोकला यासारखे लहान आजार वगळता या आठवड्यात फारशा त्रासदायक आरोग्याशी निगडीत समस्या उदभवणार नाहीत. मात्र श्वसनाचे विकार असणार्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्य बिघडवणार्या सवयींपासून दूर रहा. मध्यमवयीन लोकांनी चालण्याचा व्यायाम करावा.
तूळ-:
या आठवड्यात सर्दी-खोकला वगळता आरोग्याबाबत मोठी समस्या उद्भवण्याची शक्यता नाही. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारा. त्यासाठी आहारात डाएटीशनच्या मदतीने बदल करा. योगसाधनेची मदत घेऊन आरोग्य सुधारा.
वृश्चिक -:
किडनी तसेच हृद्यविकारांच्या रुग्णांनी या आठवड्यात काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी अल्टरनेटीव्ह मेडीसीनचा वापर करा. रक्तदाबाचा त्रास,मधूमेह असलेल्यांनी आहाराच्या बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे.जंकफूड खाणे टाळा आणि पोषक पदार्थांचा आहारात समावेश करा.
धनू -:
मध्यमवयीन व त्याहून अधिकच्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. वेळीच उपचार सुरू न केल्यास आजाराची गंभीरता वाढल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागेल.पचनाच्या विकारांवर वेळीच उपचार करा. योगा आणि ध्यानसाधना केल्यास तुम्हांला फायदा होऊ शकतो.
मकर -:
ग्रहांची प्रतिकुलता पाहता, आरोग्याची काळजी घ्या. प्रतिबंधक उपायांनी आजारांवर नियंत्रण ठेवा. अपघाताने इजा होण्याची दाट शक्यता आहे.
कुंभ -:
राशीतील ग्रहांच्या युतीमुळे आजारपण गंभीर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लहान आजारांकडेदेखील दुर्लक्ष करू नका. काही लक्षण आढळताच वेळीच वैद्यकीय तपसणी करून घ्या. उशीर केल्यास त्याची गंभीरता वाढू शकते.
मीन-:
काही लहानसहान दुखणं वगळता तुमचे आरोग्य उत्तम राहिल. मध्यम व त्याहून अधिक वयाच्या लोकांनी मात्र अशा लहान समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. श्वसनाचे व्यायाम, योगा तसेच चालण्याचा व्यायाम केल्याने तुमचे स्वास्थ्य सुधारण्यास मदत होईल.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar