Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

शिश्न (पेनिज) ची उंची वाढवता येते का ?

$
0
0

ही माहिती 18 वर्षांवरील प्रेक्षकांनीच पहावी. पालकांच्यासोबत किंवा त्यांच्या सल्ल्याने पुढील दृष्यं पहावीत. 18 वर्षाखालील मुलांनी ही दृष्यं पाहणे टाळा .  * T&C and Privacy Policy also apply  


 

मी 25 वर्षांचा युवक आहे. इरेक्ट केल्यानंतर माझ्या शिश्नाची (पेनिज) उंची सुमारे 5 इंचेस आहे. माझ्या साथीदाराला आनंद देण्यासाठी माझे शिश्न छोटे आहे असे मला वाटते. त्यासाठी मी पेनिज एन्लारजमेंट तंत्राचा वापर करू का ? त्याचा वापर करणे योग्य आणि सुरक्षित आहे का  ?

5 इंच ही साईझ सामान्य भारतीय पुरूषांच्या शिश्नाची  अगदी नॉर्मल साईझ आहे. त्यामुळे तुम्हांला घाबरण्याची काहीच गरज नाही. तसेच पेनिज एन्लारजमेंट तंत्राची मदत घेण्याची काहीच गरज नाही.

सध्या भारतामध्ये शिश्नाची उंची वाढवण्यासाठी कोणतेच तंत्र विकसित नाही तसेच गोळ्याही उपलब्ध नाहीत. पण शिश्नाचा आकार वाढवण्यासाठी ‘ज्वेलकिंग’ या तंत्रांचा काहीजण वापर करतात. यामध्ये सक्शनचा वापर करून शिश्न वाढवले जाते. पण हा एक धोकादायक आणि त्रासदायक पर्याय आहे. यामुळे  शिश्नाचे नुकसान होऊन तुम्ही इरेक्शन करूच शकणार नाही. याप्रकारामुळे  स्नायूंवर येणार्‍या दबावामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. तसेच शिश्नाची ताठरता कमकुवत होण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच अशा सल्ल्यांनी निर्णय घेण्याऐवजी योग्य डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या.

या पर्यायाव्यतिरिक्त ‘शस्त्रक्रिया’ करून शिश्नाची उंची वाढवण्याचा काहीजण प्रयत्न करतात. पण यामुळेदेखील फारसा फायदा होत नाही. ज्या युवकांनी अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांचा आधार घेतला होता. त्यांच्यापैकी अनेकांच्या शिश्नांची ताठरता शस्त्रक्रियेपूर्वी अधिक चांगली होती. अशी प्रतिक्रिया तरुणांनी दिली आहे.

मूळातच तुमच्या शिश्नाच्या इंचीपेक्षा तुम्ही अधिक चांगल्याप्रकारे तुमच्या स्त्री साथीदाराला सेक्सचा आनंद कसा देऊ शकता यावर त्यांचे समाधान अवलंबून असते. पुरूषांच्या शिश्नाबाबत तुम्हांला या आश्चर्यकारक गोष्टी ठाऊक आहेत का ?

संबंधित दुवे -

एकत्र ऑर्गेझम मिळवण्याच्या 5 खास टीप्स !

लग्नानंतरही ‘हस्तमैथून’ करणे योग्य आहे का ?

 


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source –  Is there a way to enlarge my penis? (Query)


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>