Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

केळं-खजूराचा हेल्दी मिल्कशेक !

$
0
0

अनेकदा सकाळी उठायला उशीर झाला तर घाईगडबडीच्या वेळी नाश्ता न करताच अनेकजण घराबाहेर पडतात. आहारतज्ञांच्या मते, दिवसभरातील नाश्ता हा ‘राजा’सारखा असावा. दिवसभरातील आहारात नाश्त्याचा भाग किमान 25% असावा. यामुळे दिवसभर शरीराला उर्जा मिळते. शरीराचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. आपण कितीही घाईत असलो तरीही नाश्ता टाळणे चूकीचे आहे. खाणं टाळणे, तुम्हाला बनवू शकते लठ्ठ ! हे तुम्हांला ठाऊक आहे का?

सर्वसामान्यपणे आपल्या घरात केळं आणि खजूर हे घटक आवर्जून आढळतात. मग त्यांपासून झटपट होणारा मिल्कशेक पिऊन दिवसाची सुरवात करा. या दोन्ही घटकांमधून शरीराला उर्जा मिळते. तसेच हेल्दी मार्गाने भूकेवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. खजूरामधील मिनरल्स आणि आयर्नचा मुबलक साठा नैसर्गिकरित्या हिमोग्लोबीन  वाढवण्यास मदत करते. तर केळं वजन नियंत्रणात ठेवण्यास मद्त करते. ( नक्की वाचा : वजन घटवा या 5 पिवळ्या पदार्थांनी ! )

साहित्य -:

  • बिया काढलेले 4-5 खजूर
  • ग्लासभर दूध
  • एक केळं
  • 2-3 बदाम

कृती -:  मिक्सरच्या भांड्यामध्ये सारे साहित्य एकत्र करून त्याची स्मुथी बनवा. गरजेनुसार तुम्ही त्यामध्ये दूध मिसळू शकता. खजूर आणि केळं दोन्ही चवीला गोड असल्याने त्यामध्ये गोडवा वाढवण्यासाठी अतिरिक्त साखर किंवा गूळ घालायची गरज भासत नाही. त्यामुळे तुमचे वजनही आटोक्यात राहण्यास मदत होते.

   टीप-:      केळं घरात नसल्यास तुम्ही फक्त खजूराचा मिल्कशेकदेखील बनवू शकता. तसेच काळा मस्कदी खजूर हा नरम व बियाविरहित असल्याने तो तुम्ही थेंट वापरू शकता. पण चॉकलेटी आणि कडक खजूर घरात उपलब्ध असल्यास तो रात्रभर थोड्या पाण्यात भिजवून सकाळी दूधात वाटून मिल्कशेक बनवा.

संबंधित दुवे -

सफरचंदाची खीर – लहान मुलांसाठी हेल्दी-टेस्टी पर्याय !

पोहे- नाश्त्याचा अत्यंत हेल्दी पर्याय

‘व्हेजिटेबल मसाला इडली’- हेल्दी ब्रेकफास्टची एक टेस्टी डिश !


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source –  Healthy recipe – Date and banana smoothie


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles