Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

अस्थमाचा त्रास दूर करणारा नैसर्गिक उपाय !

$
0
0

अस्थमाच्या रुग्णांना काही विशिष्ट प्रकारचा डाएट फॉलो करणं अटळ असते. काही अन्नपदार्थांची अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन झाल्यास अस्थम्याचा त्रास वाढू शकतो. तसेच श्वास  घेण्यास त्रास होतो. पण काही पदार्थांमुळे अस्थमावर नियंत्रण मिळवण्यासही मदत होते. आजकाल बाजारात सहज उपलब्ध होणारे ‘किवी’ हे फळ अस्थमाच्या रुग्णांसाठी वरदान आहे. जाणून घ्या किवीचे आरोग्यदायी फायदे !

कसे आहे किवी फायदेशीर ? 

किवीमध्ये व्हिटामिन सी घटक मुबलक प्रमाणात आढळतात. कपभर किवीच्या तुकड्यांमधून अंदाजे 164मिलीग्रॅम व्हिटामिन सी मिळते. म्हणजेच नियमित आवश्यकतेपेक्षाही सुमारे 273% व्हिटामिन सी शरीराला अधिक मिळते. अस्थमाच्या रुग्णांमध्ये श्वसनमार्गातील अडथळे दूर करण्यास किवी अत्यंत फायदेशीर ठरते. श्वसनमार्गात अ‍ॅलर्जीमुळे होणारा दाह कमी करण्यास किवी मदत करते. हा वैज्ञानिकांचा सल्ला आहे. रक्तातील इम्युसेलचे  (रोगप्रतिकारकक्षमता वाढवणारे घटक) कार्य सुधारण्यास मदत होते. श्वसनविकारांना दूर करण्यासाठी ‘जलनेती‘ फायदेशीर आहे.

थोरॅक्स या जर्नलमधील अहवालानुसार जी मुलं आठवड्यात 5-7 किवी खातात. त्यामधील अस्थम्याच्या लक्षणांमध्ये 44% घट दिसून आली आहे. यासोबतच लहान मुलांमधील कफ,सर्दी, खोकल्याचा त्रासही किवीच्या सेवनामुळे कमी झाल्याचे आढळून आले आहे.

संबंधित दुवे -:

‘दम्या’चा त्रास दूर करणारे ‘५’ घरगुती उपाय !

व्हिडीयो: अस्थमावर गुणकारी योगासनं !


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source –  Good health tip #5: Eating kiwi could help asthmatics

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>