नवजात बाळ हे निरागस आणि सुंदर असतं. त्यामुळे त्याच्या जन्मानंतर नातेवाईक, मित्रमंडळी आणि घरातील लहान मुलंदेखील बाळाला बघायला, भेटायला हॉस्पिटलमध्ये गर्दी करतात. नवजात बाळाची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्याने अनेकदा भेटायला येणार्या अनेक नातेवाईकांमुळे त्याला इंफेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून दिल्ली येथील मॅक्स हॉस्पिटल्सच्या सिनियर कंन्सलटंट आणि गायनॅकोलॉजिस्ट डॉ. उमा वैद्यनाथन यांनी दिलेल्या या टीप्स अवश्य लक्षात ठेवा.
- हात स्वच्छ धुवा -:
जन्मानंतर पहिले 6-8 आठवडे बाळाची रोगप्रतिकारशक्ती फार कमकुवत असते. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आईला तसेच बाळाला भेटण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा.
- भेटण्यापूर्वी किमान तासभर आधी धुम्रपान टाळा-:
धुम्रपान करणं ही स्वतःसाठी जितकी घातक गोष्ट आहे तितकाच त्याचा त्रास आजूबाजूच्या लोकांनादेखील होतो. पण नवजात बाळाला भेटण्यापूर्वी किमान तासभर आधी धुम्रपान करा. तसेच त्यानंतर चूळ भरा. हात स्वच्छ धुवा. यामुळे सिगारेटचा वास दूर होईल. सिगारेटच्या वासामुळे लहान बाळाला त्रास होऊ शकतो तसेच अॅलर्जीचादेखील धोका वाढतो.
- खूप जवळचे नातेवाईक असाल तरच बाळाला उचलून घ्या.
लहान बाळाच्या चेहर्यावरील निरागस भाव पाहून अनेकांना त्यांना उचलून घेण्याचा मोह होतो. मात्र सार्यांनीच बाळाला हात लावणं टाळा. त्यामुळे अनेक घरातील लोकं प्रत्येकालाच बाळाला हात लावू देत नाहीत. काहीवेळेस व्यक्ती ओळखीची नसल्यास बाळ रडायला लागतात. तसेच बाळाला किस करणे टाळा. यामुळे संसर्ग होण्याचा धोका असतो.
अति बॉडी स्प्रे वापरणे टाळा-
नवजात बाळाचा वास घेण्याचा सेंन्स पुरेसा विकसित झालेला नसतो. त्यामुळे खूप उग्र वासाच्या बॉडी स्प्रे मुळे बाळाला त्रास होऊ शकतो. तसेच अॅलर्जिक रिअॅक्शन होऊ शकते. त्यामुळे बाळाला भेटण्यापूर्वी या गोष्टींचा विचार करा.
- सर्दी-खोकला झाला असल्यास, बाळाला भेटणे टाळा
नवजात बालकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असते. अशात तुम्हांला सर्दी- पडशाचा, शिंकण्याचा त्रास होत असल्यास बाळाला भेटणे टाळा. यामुळे कारण हवेतून जंतूसंसर्ग झटपट पसरू शकतो.
- योग्य खेळणी गिफ्ट करा
मुलं तोंडात घालतील किंवा घशात अडकतील अशी लहान खेळणी मुलांना गिफ्ट करू नका. तसेच काही कपडे तुम्ही गिफ्ट करत असाल त्याचा कपडा पाहून योग्य निवड करा. काही वेळेस कपड्याची लहान मुलांच्या त्वचेवर रिअॅक्शन होऊ शकते.
संबंधित दुवे -
मुलांना ‘स्ट्रॉग’ बनवतील ‘सुवर्णप्राशन’चे दोन थेंब !
बाळाला दात येताना होणारा त्रास सुसह्य करणार्या 5 टिप्स !
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source - 6 tips to follow while visiting a newborn baby
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.