लहान मुलांच्या वाढीमध्ये दूध अत्यंत गरजेचे असते. मात्र मूल दूध फारसे आवडीने पित नसल्याने त्याचा आहारात समावेश करण्यासाठी आईला स्मार्ट उपाय करणे भाग पडते. अशावेळी अॅपल-बदाम खीर हा उत्तम पर्याय आहे. 2 वर्षांपर्यंतच्या मुलांना गाईचे दूध देणे शक्य नसेल तर दूधाची पावडर देण्याचा पर्याय ‘WHO’ या आरोग्यसंस्थेने दिला आहे. मग थंडीत बाजारात सफरचंद अगदीच मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने तुम्ही हा पर्याय नक्कीच वापरू शकता.
साहित्य -:
- स्वच्छ धुऊन साल काढून खिसलेले सफरचंद
- रात्रभर भिजवलेल्या 6-8 बदामांची पेस्ट
- 1 ½कप दुध किंवा 2 चमचे दूध पावडर
- चवीला गूळ
कृती -:
- जाड आणि खोलगट पातेल्यात दूध ओतून त्याला उकळ काढून घ्या.
- यामध्ये सफरचंदाची प्युरी मिसळून पुन्हा उकळ येऊ द्या.
- बदामाची पेस्ट करून दुधात मिसळा.
- 10-15 मिनिटं हे मिश्रण उकळू द्या. खीरीइतके मिश्रण जाडसर होईपर्यंत दूध उकळू द्या. त्यानंतर आवश्यकता वाटल्यास त्यात दूध किंवा पाणी मिसळा.
- गोड कमी वाटल्यास गूळाचा खडा मिसळा. मात्र लहान बाळांना ही खीर देताना त्यात साखर,मध, दालचिनी टाकू नका.
- त्याची पोषकता वाढवण्यासाठी त्यात बेदाणे मिसळा.
- त्यानंतर गॅस बंद करा आणि थोडी थंड करून मुलांना खायला द्या.
टीप : तुम्ही दूधाची पावडर वापरत असल्यास 2 स्कुप्स पावडर 500 मिली किंवा दीड कप पाण्यात आणि अॅपल-बदामाच्या पेस्टमध्ये मिसळा. हे मिश्रण काही मिनिटं उकळा आणि त्यानंतर गॅस बंद करा. नैसर्गिकरित्या मिश्रण थंड झाल्यावर खावे.
संबंधित दुवे -
लहान मुलांचा नेमका आहार कसा असावा ?
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source – Weaning recipe: Apple badam kheer
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.