शुटींगच्या व्यस्त वेळा आणि त्यात भूमिकेच्या गरजेनुसार बदलणारे कलाकारांचे रूटींग यामधून वेळ काढून स्वतःच्या फीटनेसकडे लक्ष देणे कलाकारांसाठी थोडे कठीणच असते. मात्र 2015 साली काही सेलिब्रिटींनी भूमिकेची गरज म्हणून वजन घटवले तर काहींनी वाढवले देखील. मग 2015 साली सेलिब्रिटींनी केलेले हे बॉडी ट्रान्सफरमेशन तुम्हांलाही प्रेरणादायी ठरू शकते.
1) जितेंद्र जोशी -:
‘बाजी’ चित्रपटातून अनेक वर्षांनी मराठीत पुन्हा एंट्री करणार्या श्रेयस तळपदे सोबतच या चित्रपटातील विशेष आकर्षण ठरला तो जितेंद्र जोशी. खलनायकाच्या भूमिकेत दिसणार्या जितेंद्र जोशीने त्याच्या भुमिकेसाठी शरीरावर विशेष मेहनत घेतली होती. सेलिब्रीटी फिटनेस एक्सपर्ट शैलेश परुळेकर यांच्या सल्ल्याखाली जितेंद्रने आपला रांगडा लूक बनवला होता.
2) सोनाली कुलकर्णी – :
अभिनयासोबतच स्वतःच्या फीटनेस आणि लूक बाबतही चोखंदळ असणार्या सोनाली कुलकर्णीने यंदा 13 किलो वजन घटवले आहे. केवळ भूमिकेसाठी सीमीत न राहता तिचा हा लूक आता पुढेही मेंटेंन्ट ठेवण्याकडे सोनाली प्रयत्नशील राहतेय. डाएट म्हणजे केवळ बारीक होणे किंवा भूक मारणे जगणं नव्हे तर त्यातून स्वतःला आनंदही मिळवता आला पाहिजे हा तिचा हट्टाहास आहे. मग पहा हेल्दी मार्गाने सोनालीने कसे घटवले तिचे वजन
3) वैभव मांगले -:
छोट्या पडद्यापासून बरेच दिवस लांब राहिलेल्या वैभव मांगलेने ‘माझे पती सौभाग्यवती’ या झी मराठीच्या सिरीयलमधून पुन्हा एंट्री घेतली आहे. या मालिकेत वैभव स्त्री पात्रामध्येदेखील दिसत असल्याने त्याला अभिनयासोबतच स्वतःच्या शरीराकडे,सौंदर्याकडे थोडे अधिक लक्ष देणे गरजेचे होते. त्यानुसार वैभव नियमित जीम करून बारीक आणि सुडौल दिसण्याचा प्रयत्न करत आहे.
4) तेजस्विनी पंडीत -:
सोशिक आणि ठराविक पद्धतीच्या भूमिकांमध्ये अडकलेली तेजस्विनी संजय जाधव दिग्दर्शित ‘तू ही रे’ या सिनेमाच्या माध्यमातून अगदीच बोल्ड आणि ब्युटीफूल अंदाजातून सार्यांसमोर आली. या भूमिकेसाठी तेजस्विनीने थोडे वजनही कमी केले.तसेच एका अनोख्या आणि मनमोहक अंदाजातून ‘गुलाबाची कळी’ खुलली. सौंदर्यवती तेजस्विनी पंडीतची ब्युटी सिक्रेट्स तुम्हीदेखील जरूर जाणून घ्या.
5) भूमी पेडणेकर -:
बॉलिवूडमध्ये 80 किलो वजन असताना मुख्य पात्राच्या माध्यमातून पदार्पण करण्यासाठी धाडस लागते. ‘ दम लगाके…’ या हिंदी चित्रपटातून भूमीने केवळ पदार्पण केले नाही तर यशही कमावले. भूमिचा प्रवास इथेच थांबला नाही तर त्यानंतर तिने वजन घटवून फीट आणि हेल्दी राहण्यासाठीदेखील प्रयत्न केले.
छायाचित्र सौजन्य – facebook Account
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.