मेष -:
या आठवड्याच्या शेवटच्या काही दिवसात अनपेक्षित आरोग्यविषयक समस्यांमुळे घरीच आराम करणे भाग पडेल. अर्थ्राईटीस सारख्या दीर्घकाळ चालणार्या आजारांचे दुखणे या आठवड्यात अधिकच त्रासदायक ठरेल. त्यापासून आराम मिळवण्यासाठी योग्य ट्रीटमेंट करा.
वृषभ -:
मधूमेहींनी आहाराचे पथ्यपाणी सांभाळणे गरजेचे आहे. रक्तदाबामध्ये होणारे चढ-उतार नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित चेकअप करा. हलका व्यायाम करा तसेच डॉक्टरांकडून वेळीच योग्य सल्ला घ्या.
मिथून -:
मधूमेहाचा त्रास असणार्या व्यक्तींनी त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आहाराच्या पथ्यपाणी सांभाळण्यासोबतच नियमित चाचणी करणेदेखील आवश्यक आहे. हा नियम इतर दीर्घकाळ चालणार्या आजारांच्या रुग्णांनादेखील लागू होतो. अपघाताची शक्यता असल्याने विशेष काळजी घ्या.
कर्क -:
आरोग्याशी निगडीत फारशा समस्या या आठवड्यात उद्भवण्याची शक्यता नाही. मात्र काही दुखणे असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. काही लहानसहान लक्षण आढळताच त्यावर उपाय करा म्हणजे आजार गंभीर होणार नाही. तसेच पोषक आहार आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करा.
सिंह -:
श्वसनाच्या विकारांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपाय करा. अन्यथा त्याचे स्वरूप वाढू शकते. संधीवाताच्या रुग्णांचे दुखणे अधिक वाढण्याची शक्यता आहे. काही अल्टरनेटीव्ह उपायांनी या त्रासावर मात मिळवण्याचा प्रयत्न करा. सकाळ-संध्याकाळ चालण्याचा व्यायाम केल्याने तुम्हांला फायदा होऊ शकतो.
कन्या
या आठवड्यात सर्दी,खोकला त्रासदायक ठरण्याची शक्यता अधिक आहे. याव्यतिरिक्त मोठे आजार त्रासदायक ठरण्याची शक्यता नाही. मध्यम व वयस्कर लोकांनी जीवनशैलीशी निगडीत समस्यांकडे लक्ष देण्यास सुरवात करणे हितावह ठरेल. फारच शारिरीक कष्टाची कामं टाळावीत.
तूळ -:
आरोग्याशी निगडीत समस्यांचा विचार करता, हा आठवडा आरोग्यदायी आहे. मधूमेह,रक्तदाब अशा समस्यांचा त्रास असणार्यांनी नियमित मेडीकल चेकअप करून आजार नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा.
वृश्चिक -:
रक्तदाबामध्ये चढउतार होण्याची शक्यता असल्याने काळजी घेणे आवश्यक आहे. अॅसिडीटी किंवा पचनाच्या विकारांवर वेळीच उपाय करा. काही दिवस घरीच आराम करून पुन्हा रिफ्रेश व्हा तज्ञांच्या मार्गदर्शनाने ‘रिलॅक्ससेशन टेक्निस’ शिकून घ्या.
धनू -:
राशीतील ग्रहमान पाहता, रक्तदाबाचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे या स्थितींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मधूमेहींनीदेखील काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच आहाराच्या बाबतीतही चोखंदळ रहा. अधिकाधिक पोषक आणि आरोग्यदायी आहार घ्या.
मकर -:
या आठवड्यात अनपेक्षितपणे काही आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. स्पेशॅलिस्ट डॉक्टरांकडून योग्य निदान आणि उपाचार करून घ्या. बदलत्या ऋतूमानामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो.
कुंभ -:
हा आठवडा तुमच्यासाठि आरोग्यदायी राहील. मध्यमवायीन लोकांनी मात्र आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. अस्थमा, रक्तदाबाच्या रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक आहे. सांघेदुखीच्या रुग्णांनी काही अल्टरनेटीव्ह उपायांनी त्रास कमी करण्याचा प्रयत्न करा.
मीन -:
बदलत्या ऋतूमानाचा तुमच्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच केलेल्या उपायांनी त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा. अर्थ्राईटीस, मधूमेहांच्या रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच अल्टरनेटीव्ह उपायांनी आजारांवर नियंत्रण मिळवा.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.