आजकाल शाळेत जाणार्या चिमुरड्यांपासून ते अगदी साठीतल्या आजी-आजोबांपर्यंत सार्यांचे जीवन तणावग्रस्त आणि धावपळीचे झाले आहे. अशावेळी स्वतःच्या फीटनेसकडे आवर्जून लक्ष देण्यासाठी जीम, योगा, ध्यान यांची मदत घेतली जाते. मात्र रटाळ आणि रोज एकाच प्रकारचा व्यायाम करणे तुम्हांला कंटाळवाणे वाटत असेल तर इतरही काही मजेशीर प्रकारांमधून तुम्ही तुमचा फीटनेस मेन्टेंट ठेऊ शकता. ‘झुंबा’ हा असाच एक मजेशीर वर्कआऊट प्रकार ! अभिनेत्री आणि झुंबा फ़ीटनेस ट्रेनर रीना अग्रवाल हीच्याकडून थेट जाणून घ्या ‘झुंबा’ प्रकाराबद्दल खास
- ‘झुंबा’ म्हणजे काय ? आणि तो अल्पावधीतच कसा ‘पॉप्युलर’ होतोय ?
झुंबा हा एक प्रकारचा कार्डीयो वर्कआऊट आहे. जीममधल्या एकाच प्रकारच्या व्यायाम प्रकाराने लोकं कंटाळली आहेत. पण ‘झुंबा’ हा आधुनिक युगातील एक मजेशीर वर्कआऊट प्रकार आहे. यामध्ये विशिष्ट प्रकारच्या संगीतामध्ये 40-45 मिनिटं तुम्ही सतत मुव्हमेंट करत असता. यावेळी तुमच्याही नकळत आणि आनंद घेताघेता कॅलरीज बर्न होत असतात. वर्क आऊट करताना तुमचा हार्ट रेटही सुधारतोय. त्यामुळे रटाळ व्यायामप्रकारांऐवजी मजा करत फीटनेस मेंटेंन्ट करणं लोकांना अधिक सोयीस्कर वाटतय म्हणून ते कमीत कमी वेळात अधिक पॉप्युलर होतयं.
- ‘झुंबा’ मुळे कोणकोणत्या समस्यांपासून सुटका मिळू शकते ?
झुंबा हा ‘फन वर्कआऊट’ आहे. त्यामुळे नक्कीच केवळ विशिष्ट समस्येशी ते सीमीत नसते. सकाळपासून कामाला सुरवात झाली की संध्याकाळपर्यंत सहाजिकच आपण मानसिक किंवा शारिरीकरित्या थकतो. अशावेळी झुंबा सारखी ग्रुप अॅक्टिव्हिटी करताना तुम्ही अनेकांना भेटता. यामुळे ताण-तणाव हलका होतो. तसेच ड्रीप्रेशन सारख्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या समस्यांदेखील दूर होतात.
झुंबा हा कर्डीयो वर्कआऊट असल्याने शरीरातील कॅलरीज कमी होतात. त्यामुळे वजन आटोक्यात राहते. तसेच बारीक असणार्यांसाठी ‘झुंबा टोनिंग’ या प्रकारामुळे शरीर टोन मध्ये ठेवण्यास मदत होते.
- ‘झुंबा’ साठी वयाचे बंधन असते का ?
व्यायाम किंवा फीटनेस हा सार्याच वयातील लोकांना आवश्यक असतो.मग झुंबासाठी वयाचे बंधन नाही. लहान – मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सारेच ‘झुंबा’ करू शकतात. त्याला वयाचं बंधन नाही. परंतू तुमच्या शारिरीक व्याधीनुसार त्याची तीव्रता आणि प्रकार तुम्ही निवडू शकता.
- ‘झुंबा’ शिकण्यासाठी ‘डान्सर’ असणं आवश्यक आहे का ?
हा केवळ एक गैरसमज आहे. एखाद्या पार्टीमध्ये आपण जसे ‘मनसोक्त’ आणि बिनधास्त नाचतो. तसेच ‘झुंबा’ करतानादेखील तुम्हांला डान्स करता येतो की नाही. हे बंधन मूळीच येत नाही.
- ‘गरोदर स्त्रिया’ झुंबा करू शकतात का ?
जसे झुंबाला वयाचं बंधन नसतं तसंच व्याधींचं बंधन नसतं. पण शारिरीक अवस्थेनुसार झुंमा ट्रेनर गरोदर स्त्रियांना योग्य प्रकार सुचवतात. त्यामुळे गरोदरपणात आणि त्यानंतरही वजन आटोक्यात ठेवण्यासाठी ‘झुंबा’ अगदी फायदेशीर आहे. बेली डान्स देखील गर्भारपणानंतर वजन घटवण्याचा हेल्दी उपाय आहे.
मग झुंबा या वजन घटवण्याचा स्टाईलिश फंड्याची एक झलक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
संबंधित दुवे -:
वजन घटवा ’8′ मजेशीर व्यायामप्रकारा संगे !
व्हिडियो: जिम नाही, ‘बेली डान्स’ करून रहा अॅन्ड फाईन !
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी , मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा.