व्हर्जायनल ड्रायनेस म्हणजेच योनीमार्गाची शुष्कता खूपच त्रासदायक असते. यामुळे त्या भागाजवळ जळजळणे, खाज येणे, मूत्रविसर्जनाच्या वेळी वेदना होणे तसेच सेक्स करताना त्रास होणे अशा समस्या आढळतात.
योनीमार्गाच्या शुष्कतेचे प्रमुख कारण म्हणजे इस्ट्रोजनचे कमी झालेले प्रमाण. मोनोपॉजनंतर हे होणे स्वाभाविक असतेच. काही स्त्रियांमध्ये ही समस्या स्तनपानाच्या काळातदेखील होते. तर काही शारिरीक समस्यांमुळेदेखील इस्ट्रोजेनचे प्रमाण कमी होते. नक्की वाचा -: या डाएट टीप्सने कमी करा ‘मोनोपॉज’चा त्रास !
प्री- मोनोपॉजल व्हर्जायनल ड्रायनेसमुळे स्त्रिया दिवसभर निस्तेज रहतात किंवा थकवा फार लवकर येतो. यावर अनेक उपाय आहेत.सोयाबीनयुक्त आहार घेणे, इस्ट्रोजन वाढवण्यासाठी गोळ्या घेणे किंवा खोबरेल तेलासारखा घरगुती आणि नैसर्गिक उपाय वापरून हा शुष्कपणा कमी करता येतो.
का ठरते खोबरेल तेल फायदेशीर ?
- उत्तम ल्युबरिकंट:
खोबरेल तेलामुळे योनीमार्गाजवळील जागा मॉईश्चराईज होते. तसेच खोबरेल उत्तम ल्युबरिकंट असल्याने जळजळ, खाज येणे कमी होते.तेथील जागा मुलायम होऊन वेदना कमी होण्यास मदत होते.
- इंफेक्शनपासून बचाव होतो :
खोबरेल तेलामध्ये अॅन्टीबॅक्टेरियल आणि अॅन्टीसेप्टीक गुणधर्म असल्याने फंगल आणि बॅक्टेरियल इंफेक्शन दूर होते.
- शुष्कता कमी होते :
इस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे तेथील जागा शुष्क आणि वेदनादायी बनते. खोबरेल तेलामुळे शुष्कता कमी होते. तसेच जननेद्रियाला होणारा बॅक्टेरिया आणि फंगसचा धोका कमी होतो. यामुळे इंफेक्शन अधिक पसरत नाही.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source – Coconut oil to ease vaginal dryness
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.