Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

बाळाला मांसाहार भरवताना या ‘७’गोष्टींची काळजी घ्या !

$
0
0

मांसाहारी पदार्थांमधून मुबलक प्रमाणात प्रोटीन्स मिळतात. तसेच मांसाहारी पदार्थ खाल्याने स्नायू बळकट होतात व मुलांची शक्ती वाढण्यासही मदत होते. परंतु बाळ साधारणत: एक वर्षाचे होइपर्यंत, त्याला मांसाहारी पदार्थ पचायला जड जाऊ शकतात. त्यामुळे बाळाला मांसाहारी पदार्थ भरवण्यापूर्वी हे काही नियम पाळणे आवश्यक आहे –

  1. सुरुवातीला अंड द्यावे –

अंड हा प्रोटीन्स मिळवण्याचा एक उत्तम स्रोत असून, अंड पचायला सोपे असल्याने बाळाला त्रास होण्याचा धोका कमी असतो. ध्वनी शहा या बाल पोषकतज्ज्ञांच्या मते, बाळ नऊ महिन्यांचे होईपर्यंत त्याला अंड देऊ नये. कारण मांसाहारी पदार्थांचे पचन होण्यासाठी बाळाची पचनशक्ती विकसित होणे आवश्यक असते.

  1. बाळ एक वर्षांचे झाल्यानंतर चिकन किंवा मासे द्यावे -

बाळाला मासे किंवा चिकन खायला द्यायचे असल्यास बाळ किमान एक वर्षाचे होईपर्यंत थांबा. बाळ 13 ते 14 महिन्यांचे झाल्यावर त्याला चिकन किंवा मासे खायला देण्यास काहीच हरकत नाही. ध्वनी शहा या बाल पोषकतज्ज्ञांच्या मते,  सुरुवातीला बाळाला चिकन किंवा माश्यांचे फक्त सूप द्यावे. ते पचू लागल्यावर हळूहळू मांसाचे शिजवलेले तुकडे द्यावेत.

  1. अगोदर मासे द्यावेत –

बाळाला पहिल्यांदा मांसाहारी पदार्थ खायला देताना चिकनच्या अगोदर मासे द्यावेत. मासे पचायला लागल्यावर हळूहळू चिकन देण्यास सुरुवात करावी. परंतु अगोदर सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला फक्त सूप द्यावे आणि एक महिन्यानंतर बाळाला वाफवलेले, उकडलेले किंवा भाजलेले मांसाचे तुकडे द्यायला सुरुवात करावी.

  1. लाल मांस देताना थोडा विचार करा –

बाळाला लाल मांस द्यायचे असल्यास, सॉसेज किंवा गडद लाल मांस देण्यापेक्षा कोकराचे मांस द्यावे. ध्वनी शहा यांच्या मते, कोकराचे मांस सोडल्यास इतर लाल मांसामध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असते. याचा बाळाच्या मेंदूच्या विकासावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे बाळ पाच वर्षांचे होईपर्यंत त्याला लाल मांस खायला देऊ नये.

  1. मांस जास्त शिजवू नये –

बाळ तीन वर्षाचे होईपर्यंत त्याला मांस किंवा मासे नेहमी भाजून, वाफवून किंवा उकडून द्यावे.

  1. प्रमाणशीर खायला द्यावे –

बाळाला आठवड्यातून दोनदाच मांसाहारी पदार्थ खायला द्यावेत. मासे किंवा चिकन पचनास जड असल्याने ते अधिक प्रमाणात खाल्यास बाळाचा मेटॅबॉलिक दर कमी होण्याचा धोका असतो. बाळाला मांसाहार दुपारच्या जेवणात न देता, रात्रीच्या जेवणात द्यावा. ध्वनी शहा यांच्या मते, मांसाहार व त्यानंतरचे जेवण यामध्ये पचनासाठी पुरेसा वेळ असणे आवश्यक आहे.

  1. मांस योग्य पद्धतीने शिजवा –

मांस शिजवण्यापूर्वी चांगले स्वच्छ करून पाण्याने धुवावे. बाळासाठी प्रक्रिया केलेले मांस घेणे टाळावे.

संबंधित दुवे –

लहान मुलांचा नेमका आहार कसा असावा ?

मुलांसाठी खास चटकदार पण हेल्दी पदार्थांचे ’5′ पर्याय !

Translated by – Lina Bhalke

Source – 7 tips to start your baby on non-vegetarian food

छायाचित्र सौजन्य – Getty Images

 

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम’ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>