Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मोहरीने करा ‘सांधेदुखी’वर मात

$
0
0

रुमेटाइड अर्थ्रायटिस (आमवात – वाताचा एक प्रकार) हा आजार लवकर बरा होत नाही तसेच याची लक्षणे रुग्णाला अकार्यक्षम करतात. असह्य सांधेदुखी आणि कडकपणामुळे अगदी साधी-सोपी कामेही अवघड वाटू लागतात. औषधांनी हा आजार नियंत्रणात राहत असला तरी, मोहरीनेही रुमेटाइड अर्थ्रायटिसचा त्रास कमी होण्यास मदत होते.

रुमेटाइड अर्थ्रायटिसच्या रुग्णांना मोहरी कशी मदत करते ?

मोहरीमध्ये मुबलक प्रमाणात सिलेनियम आणि मॅग्नेशियम आढळते. यामुळे शरीरातील विषारी घटक निघून जाण्यास मदत होते. तसेच यातील दाहशामक क्षमतेमुळे वेदना कमी होण्यास मदत होते. आयुर्वेदानुसार, मोहरीमधील उष्णता निर्माण करण्याच्या क्षमतेमुळे दुखऱ्या जागी मोहरी लावल्यास तेथील तापमान वाढण्यास मदत होते. यामुळे तेथील स्नायू मोकळे होऊन वेदना कमी होण्यास मदत होते.

मोहरीचा उपाय कसा कराल ?

मोहरीमुळे रुमेटाइड अर्थ्रायटिसचा दोन प्रकारचा त्रास कमी होण्यास मदत होते.

सांधेदुखी

एका टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यात मोहरी टाकावी. या पाण्याने आंघोळ करावी किंवा दुखणारे सांधे शेकवावेत. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.

सूज –

मोहरीमध्ये थोडेसे पाणी मिसळून पेस्ट करावी. ही पेस्ट सूजेवर लावून २०-३० मिनिटांनी धुवावी. हा उपाय सूज कमी होइपर्यंत दिवसातून दोनदा करावा.

याचप्रमाणे संधीवाताच्या रुग्णांनी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा ते जाणून घेण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.

 seefood in marathi

 Translated by – Lina Bhalke

Source – Relieve the symptoms of rheumatoid arthritis with mustard seeds

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

मराठीत आरोग्य व उपचारसंबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम’ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>