जगात सर्वांत आव्हानामक समजली जाणारी ट्रायक्लॉन आयर्नमॅन स्पर्धा नुकतीच झुरीच ( स्वित्झरलंड) येथे पार पडली. यंदाच्या वर्षी अभिनेता, मॉडेल आणि धावपटू मिलिंद सोमण याने या स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे.
काय असते आयर्नमॅन स्पर्धा ?
- स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग अशा तीन टप्प्यांत एकाच वेळी होणारी ही स्पर्धा ‘ट्रायक्लॉन आयर्नमॅन’ या नावाने ओळखली जाते.
- या स्पर्धेची सुरवात 3.8 किमी स्विमिंगने ( स्विमिंग पूल व्यतिरिक्त इतर कोठेही जसे की समुद्र, नदी ) त्यानंतर लगेचच 180.2 किमी सायकलिंग व त्यापाठोपाठ 42.2 किमी धावणे अशी होते.
- प्रादेशिक स्वरूपानुसार या स्पर्धेची कालमर्यादा ठरवली जाते. मात्र अंदाजे 16 - 17 तासांत ही स्पर्धा पूर्ण करणे गरजेचे असते.
आयर्नमॅन स्पर्धेत यंदा पहिल्यांदाच सहभागी झालेल्या मिलिंद सोमण यांनी ही स्पर्धा स्वित्झरलंड येथे 15 तास 19 मिनिटांत पूर्ण करून ‘आयर्नमॅन’ पदावर आपले नाव कोरले आहे. येत्या नोव्हेबर महिन्यात मिलिंद वयाची पन्नाशी पूर्ण करणार आहेत. ही स्पर्धा पूर्ण केल्यानंतर त्यांनी ट्विटरवरून आपला आनंद व्यक्त केला तसेच चाहत्यांचेही आभार मानले आहेत.
One Ironman – Done
beautiful experience, finished in 15hrs.19min thank you for all your good wishes people,… http://t.co/MsKa9gGcdi
— milind soman (@milindrunning) July 20, 2015
जगभरातून २००० जणांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यातील भारताकडून 7 जणांच्या टीममध्ये मिलिंद सोमण याचाही समावेश होता. डॉ. कौस्तुभ राडकर या पुणेरी धावपटूने या टीमचे नेतृत्त्व केले होते. डॉ. कौस्तुभ राडकर यांनी ही स्पर्धा यंदा सलग 11व्या वेळेस जिंकली आहे. ( येथे क्लिक करा आणि जाणून घ्या कौस्तुभची हेल्थ सिक्रेट्स) तसेच पुढील वर्षी हवाई येथे होणार्या ‘वर्ल्ड चॅमपियनशीप’ साठी डॉ. राडकर यांची निवड झाली आहे. यासोबतच पृथ्वीराज पाटिल आणि हिरेन पटेल यांनी देखील ‘आयर्नमॅन’ पदावर आपलं नाव कोरलं आहे.
छायाचित्र सौजन्य – फेसबुक अकाऊंट
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी , मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा.