कामाच्या ठिकाणी किंवा मॉल, रेस्ट्रॉरंट, थिएटर्समध्ये पब्लिक टॉयलेटचा वापर करणे अटळ असते. पण पुरेशा स्वच्छता न पाळल्याने अशा ठिकाणी जाणे अवघड वाटू शकते. स्वच्छतेचा अभाव म्हणजे आजारांना आमंत्रण ! जंतूंचा प्रसार केवळ टॉयलेट सीटवरून नव्हे तर जमिनीवर, सिंकवर, डोअरनॉब आणि फ्लश हॅन्डलवरदेखील हे जंतू वाढू शकतात. त्यामुळे पब्लिक टॉयलेट वापरताना काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा खालील आजारांचा धोका दाट आहे.
आतड्यांचे इंफेक्शन –
विष्ठेवर वाढणार्या इ-कोलाय, स्ट्रेप्टोकोकस, स्ट्रेफायलोकोकस,शिंग्रेला यासारख्या बॅक्टेरियांमुळे आतड्यांमध्ये संसर्ग होऊ शकतो. अशा जंतुंचा संसर्ग झालेल्या विष्ठेचा टॉयलेट सीटशी संपर्क आल्यास संसर्ग वाढतो.
- ई-कोलायच्या संसर्गामुळे डायरियातून रक्त जाण्याची, पोटात मुरडा मारण्याची शक्यता असते.
- शिंग्रेला बॅक्टेरियामुळे डायरिया,पोटात मुरडा मारणे, डीसेंट्री अशा समस्यांचा त्रास होऊ शकतो.
फुफ्फुस किंवा स्क्रिन इंफेक्शन -
- स्ट्रेप्टोकोकसमुळे संसर्गजन्य थ्रोट / स्क्रिन इंन्फेक्शन होते.
- स्ट्रेफायलोकोकस बॅक्टेरियामुळे स्क्रिन इंफेक्शन,न्युमोनिया, फूड पॉईजेनिंगचा धोका असतो. हे जंतू टॉयलेटच्या आसपास अधिककाळ राहिल्यास अनेक आजार पसरण्याची शक्यता असते.
व्हायरल इंफेक्शन –
सर्दीचा त्रास टॉयलेटच्या माध्यमातूनही पसरू शकतो. सर्दीचे जंतू फार कमी काळ बाहेर जीवंत राहतात. परंतू इंफ्लूएंजा,नोरोव्हायरसचा त्रास टॉयलेटच्या वापरामुळे होऊ शकतात.
लैंगिक आजार (STDs) –
लैंगिक आजारग्रस्त व्यक्तीने टॉयलेट वापरल्यानंतर इतरांना या आजारांचा धोका वाढू शकतो. कापलेली, इंन्फेक्टेड स्क्रिन अशा जंतूंच्या संपर्कात आल्यास संसर्ग वाढू शकतो.
पब्लिक टॉयलेटचा वापर केल्याने अशा आजारांचा धोका असला तरीही घाबरून जाऊ नका. काही स्वच्छ्ता आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवल्यास संसर्गापासून दूर राहू शकता. टॉयलेट हे केवळ आजार किंवा संसर्ग पसरण्याचे माध्यम नाही. नेहमीच्या वापरातल्या यापेक्षाही अनेक घातक मार्गाने जंतूंचा प्रसार होतो. ही ’7′ लक्षणं देतात लैंगिक आजारांचे संकेत !
पब्लिक टॉयलेटच्या माध्यमातून होणारा संसर्ग टाळण्यासाठी -:
- टॉयलेटचा दरवाजा बंद -उघड करताना हॅन्ड सॅनिटायझर किंवा टीश्यू पेपर वापरा.
- टॉयलेट सीट कव्हरचा वापर करा. जर ते नसेल तर टीश्यूपेपरने सीट पुसून नंतर वापरा.
- फ्लश बटणचा वापर करताना टीश्यू वापरा.
- फ्लश केल्यानंतर कव्हर बंद करा किंवा लगेच बाहेर पडा.
- टॉयलेट वापरल्यानंतर हात स्वच्छ धुवा.
- टीश्यूपेपरने हात स्वच्छ पुसा.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Source - Diseases that you get from a public toilet
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.