Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

कढीपत्त्याची पानं आहारात मिसळून दूर करा पचनाचे विकार !

$
0
0

अनेकदा जेवणातून कोथिंबीर, पुदीना, कढीपत्त्याची पानं काढून टाकली जातात.पण पदार्थांमध्ये हे केवळ स्वादासाठी नाही आरोग्याचा विचार करून टाकली जातात. त्यातील पोषणद्रव्यं शरीराला फायदेशीर असतात. कढीपत्त्यामुळे पचन सुधारते तसेच पोटाच्या अनेक आजारांपासून तुमचा बचाव होतो. त्यामुळे आजपासून  कढीपत्त्याची पानदेखील चाऊन खा.

कढीपत्त्याच्या पानांमधील घटकांमुळे पदार्थाचे पचन सुकर होते. आयुर्वेदानुसार, कढीपत्ता पाचक आहे. यामुळे शरीरातील घातक घटक बाहेर पडण्यास मदत होते. तसेच कढीपत्त्यामुळे शरीरातील पित्ताचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच अपचनाचा त्रास होत असल्यास मळमळ कमी करण्यास मदत होते. तिखटाचे, मसालेदार जेवण जेवल्यास पोट बिघडण्याचा होणारा त्रास कमी करण्यासाठी कढीपत्ता फायदेशीर आहे. त्यातील दाहशामक घटक पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

मग आहारात कसा वाढवाल ‘कढीपत्त्या’चा वापर ? 

  • तुम्हांला थोडे तिखट जेवण आवडत असेल तर कढीपत्ता, मिरच्या, मीठ आणि टोमॅटोची एकत्र चटणी करा.
  • पराठ्यांमध्ये चिरलेला कढीपत्ता मिसळा.
  • भाज्यांमध्ये/ डाळीमध्ये चिरलेला कढीपत्ता मिसळा.
  • ताकामध्ये चिरलेला कढीपत्ता मिसळा. असे ताक दिवसातून 2-3 वेळेस प्यायल्यास डायरियाचा त्रास कमी होण्यास मदत होईल.

टीप्स : 

कढीपत्त्याची पानं तुमच्या घरातील सदस्य / लहान मुलं काढूनच जेवत असतील तर कढीपत्त्याची पेस्ट करून चटणीमध्ये किंवा भाज्या / डाळींमध्ये मिसळा. यामुळे त्यांच्या नकळत कढीपत्ता पोटात गेल्यास पचन सुधारण्यास मदत होते.

With inputs from Akansha Jhalani, dietician, Mumbai.

संबंधित दुवे -

या ’10′ आरोग्यदायी कारणांसाठी जेवणातला कढीपत्ता बाजूला काढू नका !

निरोगी यकृतासाठी प्या कढीपत्त्याचा रस


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source –  Add curry leaves to your food to improve digestion

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>