Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या ’4′प्रकारे मेथी वापरा आणि केसांचे आरोग्य सुधारा

$
0
0

मेथी हे केवळ मधूमेहींसाठी औषधी नसून केसांच्या समस्या दूर करण्यासाठीदेखील अतिशय उपयुक्त आहे. मेथीदाण्यांमुळे डॅन्डरफच्या, केसगळतीच्या समस्यांपासून सुटका मिळते व केसांची वाढ होण्यास मदत होते. आहारतज्ञ डॉ. नेहा सन्वाल्का यांच्यामते, ‘आहारात मेथी घेतल्याने तसेच त्याची पेस्ट केसांना लावल्याने ते अधिक चमकदार  होतात.’

मेथीच्या पानांमध्ये प्रोटीन आणि निकोटीन मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे केसांची  वाढ सुधारते. मेथीच्या दाण्यांची पेस्ट टाळूवर लावल्यास रक्तप्रवाह सुधारतो. तसेच हेअर फॉलिक्स सुधारण्यास मदत होते. मेथीतील अल्कलाईन घटक केसगळती आणि डॅन्डरफची समस्या दूर करण्यास मदत करतात.

केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी कशी वापराल मेथी ?

  • चमचाभर मेथीचे दाणे पाण्यात उकळून रात्रभर खोबरेल तेलामध्ये भिजत ठेवा. दुसर्‍यादिवशी सकाळी या तेलाने मसाज करावा. यामुळे केस कमकुवत होण्यापासून बचाव होतो.
  • 3 टीस्पून मेथीदाणे कपभर पाण्यात सहा तास भिजत ठेवा. त्यानंतर मेथीदाण्यांची पेस्ट करा. यामध्ये 3 चमचे शिकाकाईची पावडर मिसळा. टाळूवर या पेस्टने हलका मसाज करा. 30 मिनिटांनी सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत. हा प्रयोग आठवड्यातून एकदा केल्यास केसांची वाढ सुधारते.
  • 2 टेबलस्पून मेथी दाणे 30 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. त्यातील पाणी गाळून त्यामध्ये सुकलेल्या मेथीची पानं व नारळाचं दूध मिसळून पेस्ट बनवा. हे मिश्रण ओल्या केसांवर लावा व 20मिनिटांनी केस स्वच्छ धुवा.यामुळे केस मऊसूत होतात.
  • दोन टीस्पून मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर त्याची पेस्ट बनवून सकाळी केसांना लावा. 30 मिनिटांनी केस स्वच्छ धुवा. डॅन्डरफ दूर करण्यासाठी केस शिकाकाईने धुवा.

संबंधित दुवे -

रात्री झोपेच्या वेळेस केस बांधावेत की मोकळे सोडावेत ?

हीना- मोहरीच्या तेलाचे मिश्रण दूर करेल ‘केसगळती’ची समस्या !


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source - 4 ways methi seeds can prevent hair loss and dandruff

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>