Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

गॅस सिलेंडर लीक होत असल्याचे आढळल्यास पाळा हे ‘सुरक्षेचे उपाय’

$
0
0

कांदीवली येथील दामूनगर भागात लागलेल्या भीषण आगीत सुमारे 1000 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. तर दोघाजणांचा मृत्यू झाला आहे. एका गोदामामध्ये अनधिकृतरित्या साठवलेल्या एलपीजी सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग अधिक पसरली. कांदीवली पूर्व येथील महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या गेट नं 5 जवळील भागात ही आग पसरली. यादरम्यान वित्तहानी झाली असून दोघांचा मृत्यू तर काहीजण गंभीररित्या जखमी आहेत.

एलपीजी गॅस सिलेंडर हा प्रत्येक घरा- घरातला अविभाज्य भाग आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने घरातील गॅस सिलेंडरच्या लिकेजबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. कारण वेळीच लक्ष न दिल्यास होणारा अपघात भीषणप्रकारे जीवावर बेतू शकतो.

एलपीजी गॅस लीक कसा होतो ?

सिलेंडरमधील गॅस लीक होण्यामागे सदोष रबर ट्युब्स, रेग्युलेटरची चुकीच्या पद्धतीने केलेली फिटींग किंवा गॅस अप्लायसेंन्स चुकीच्या पद्धतीने वापरणे हे असू शकतात. तसेच अनेकदा लक्ष न दिल्याने गॅसवर तयार होणारा पदार्थ उतू जातो आणि बर्नरमध्ये जाऊन गॅस लीक होऊ शकतो.

गॅस लीक होत असल्याचे आढळल्यास काय कराल   ? 

गॅस लीक होत असल्यास एखादी ठिणगी सुद्धा आगीचा भडका उडवण्यास कारणीभूत ठरू शकते. म्हणूनच खालील गोष्टींची काळजी अवश्य घ्या -

  • गॅस लीक होत असल्याचे आढळल्यास गॅस बंद करा, अगरबत्ती, मेणबत्ती अशा प्रज्वलित गोष्टी त्वरीत विझवा.
  • एलपीजी गॅसचा रेग्युलेटर बंद करा.
  • माचीस पेटवू नका.
  • इलेक्ट्रिक स्विचेस / उत्पादन बंद,चालू करू नका.
  • दारं/ खिडक्या उघड्या करा म्हणजे गॅस घरात कोंडून रहाणार नाही.
  • गॅसच्या मेकॅनिकला, सप्लायरला  हे वेळीच दाखवा.

प्रथमोपचार -: 

  • ज्या व्यक्तीच्या घरात गॅस लीक होत असल्याचे आढळत असेल. त्यांना घरापासून दूर नेऊन मोकळ्या हवेत श्वास घ्यायला द्या. यामुळे अस्वस्थता कमी होईल.
  • त्वचेला किंवा कपड्यांशी गॅसचा संपर्क असल्यास पाण्याने स्वच्छ करा. शक्यतो कपडे बदला. आवश्यकतेनुसार वैद्यकीय मदत घ्या.
  • डोळ्याशी गॅसचा संबंध आला असल्यास  थंड पाण्याने डोळे किमान 20 मिनिटे स्वच्छ धुवा.लेन्स वापरत असाल तर ती काढा.

कोणती काळजी घ्याल ? 

  • गॅस सिलेंडर सुर्यप्रकाशापासून, उष्णतेपासून तसेच प्रज्वलनशील घटकांपासून दूर ठेवा.
  •  त्वचेशी आणि डोळ्याशी थेट संपर्क येणार नाही याची काळजी घ्या.
  • गॅस सिलेंडर आणि व्हॉल्व यांचे थेट नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.
  • एलपीजी गॅस सिलेंडर हा सरळ रेषेत ठेवा.
  • दरवर्षी गॅस सिलेंडर सप्लायरकडून ट्युब तपासून घ्या.
  • ट्युब नियमित बदला.

डिस्पोजल -

काहीवेळेस सिलेंडर्समध्ये थोड्याप्रमाणात गॅस राहिलेला असतो. अशावेळी तो डिस्पोज करण्यापूर्वी काढून टाकण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे आग भडकण्याची किंवा अपघात होण्याची शक्यता आहे. आवश्यकता नसेल तर वेळीच तो सप्लायरला परत करा.

संबंधित दुवे -

भाजण्यावर करा हे ‘७’ घरगुती उपाय

जखमांचे व्रण कमी करणारे ’8′ घरगुती उपाय !


छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Source - Steps you should take in case of an LPG cylinder gas leak

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’पेज व‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा. तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या‘फोरम‘ ला भेट द्या.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>